शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पाकमधील नासधूस केलेल्या मंदिराची पुनर्रचना तातडीने करा- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 05:10 IST

काम कधी पूर्ण करणार ते सांगण्याचाही आदेश

इस्लामाबाद : शंभर वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या हिंदू मंदिराची तातडीने पुनर्रचना करण्यास आणि ती किती मुदतीत पूर्ण करणार हे कळवण्यास पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने खैबर पख्तुनख्वॉ सरकारला आदेश दिला. या मंदिराची जमावाने नासधूस केलेली आहे. खैबर पख्तुनख्वॉतील कारक जिल्ह्याच्या टेरी खेड्यात मूलतत्त्ववादी जमिएत उलेमा-ए-इस्लाम पक्षाच्या (फाझल उर रेहमान गट) सदस्यांनी गेल्या डिसेंबरमध्ये या मंदिरावर हल्ला केला होता. मानवी हक्क कार्यकर्ते आणि अल्पसंख्य हिंदू समाजाच्या नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात मंदिराच्या पुनर्रचनेचे आदेश दिले. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती गुलझार अहमद यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने मंदिर जाळल्या गेल्या प्रकरणाची दखल घेतली.न्यायमूर्ती गुलझार म्हणाले की,‘मंदिर प्रकरणी कोणाला अटक झाली का, याची माहिती आम्हाला द्या.’ इव्हाकुई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डचे वकील इक्राम चौधरी यांनी मंदिर प्रकरणी आतापर्यंत काहीही वसुली झालेली नाही, असे न्यायालयाला सांगितले. ज्या लोकांनी मंदिर जाळले त्यांच्याकडून त्याच्या बांधकामाचे पैसे वसूल करा, असा आदेश प्रांतीय सरकारला गेल्या जानेवारी महिन्यात न्यायालयाने दिला होता. सरकारने मंदिर पुनर्रचनेसाठी ३०.४१ दशलक्ष रुपये मंजूर केल्याची माहिती न्यायालयाला दिली गेली. न्यायमूर्ती इझाझुल अहसान म्हणाले की, ‘ज्यांनी मंदिर जाळले त्यांच्याकडून पैसे वसूल करा म्हणजे त्यांना धडा मिळेल, असा आदेश न्यायालयाने दिला होता.’ फाळणीनंतर जे हिंदू व शीख भारतात गेले त्यांच्या धार्मिक स्थळांची व मालमत्तांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी इव्हाकुई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डकडे आहे. हिंदू कौन्सिलचे प्रमुख आणि नॅशनल असेम्ब्लीचे सदस्य रमेश कुमार यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्री महमूद खान म्हणाले की, कारक भाग हा संवेदनशील असून तेथे मंदिराची पुनर्रचना ही हिंदू समाजाने केली पाहिजे.’