शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

इमान आता आनंदी आहे -शैमा सेलीम

By admin | Updated: May 7, 2017 01:02 IST

मुंबईच्या सैफी हॉस्पिटलने सुटी दिल्यानंतर इजिप्तची इमान अहमद एल आती हिला अबुधाबीतील बुर्जिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

नवी दिल्ली : मुंबईच्या सैफी हॉस्पिटलने सुटी दिल्यानंतर इजिप्तची इमान अहमद एल आती हिला अबुधाबीतील बुर्जिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दीर्घ काळानंतर इमान आता आनंदी दिसत आहे, असे इमानची बहीण शैमा सेलीम हिने सांगितले. व्हीपीएस हेल्थकेअरच्या मालकीच्या बुर्जिल हॉस्पिटलमधील २0 विशेषज्ञांचे पथक इमानवर उपचार करीत आहे. तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शैमा सेलीम हिने सांगितले की, दीर्घकाळानंतर इमान आता आनंदी दिसत आहे. असंख्य लोकांच्या नजरा आमच्यावर होत्या. त्यामुळे आम्ही दोघीही अस्वस्थ होतो. काल सैफी हॉस्पिटलमधून विमानतळाकडे जायला निघालो तेव्हा रस्त्यात आम्हा दोघींनाही रडू कोसळले. प्रचंड आवाज करणाऱ्या कॉर्गो विमानातही इमान गाढ झोपी गेली.मुंबई सैफी रुग्णालयात आणण्यापूर्वी इमानचे वजन ४९८ किलो होते. सैफी रुग्णालयात तीन महिने उपचार घेतल्यानंतर तिचे वजन १७0 किलो झाले. तथापि, सैफी हॉस्पिटल आणि शैमा यांच्यात मतभेद झाल्यामुळे इमानला अबुधाबीला हलवावे लागले.सैफी हॉस्पिटल आणि शैमा सेलीम यांच्यातील मतभेद संघर्षाच्या पातळीवर गेल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप केला होता. शुक्रवारी राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, विदेशी रुग्ण जेव्हा जेव्हा भारतात उपचारासाठी येतील, तेव्हा तेव्हा दोन्ही देशांच्या दूतावासांनी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करायला हव्यात. त्यामुळे भविष्यात अशा समस्या निर्माण होणार नाहीत.  इमानच्या प्रकरणात फारच वाद-विवाद झाले. यात स्वत: परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना हस्तक्षेप करावा लागला. आमच्या रुग्णालयांना जगभरातून रुग्ण मिळत असतात. अशा घटनांनी आमच्या डॉक्टरांची प्रतिमा मलिन होते.