शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

चित्रपट पाहाल तर आई-वडील जाणार थेट तुरुंगात! किम जाँग उनचा अजब कायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 08:30 IST

हॉलिवूड चित्रपट, मालिका बघणाऱ्या मुलांना ५ वर्षांचा कारावास होऊ शकतो, अशी तरतूद उत्तर कोरियाने नव्या कायद्यात केली आहे.

प्योंगयांग : उत्तर कोरियामध्ये मुलांना हॉलिवूडसहित अन्य विदेशी चित्रपट किंवा मालिका बघण्यावर पूर्वीपासूनच बंदी आहे. मात्र आता बंदीहुकूम मोडणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांना तुरुंगात धाडले जाईल, तसेच त्यांना ६ महिने मजूर छावणीत काम करावे लागणार आहे, असा नवा कायदा त्या देशाचा हुकूमशहा किम जाँग उन याने केला आहे. 

हॉलिवूड चित्रपट, मालिका बघणाऱ्या मुलांना ५ वर्षांचा कारावास होऊ शकतो, अशी तरतूद उत्तर कोरियाने नव्या कायद्यात केली आहे. इतकेच नव्हे मुलांच्या आई-वडिलांनाही कठोर शिक्षा करण्याचा निर्णय घेऊन किम जाँग उन याने मुलांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण कोरियात नाटक, संगीत या गोष्टी विलक्षण लोकप्रिय आहेत. त्यामुळे उत्तर कोरियाने २०२० साली एक कायदा केला होता. त्यानुसार वैचारिक व सांस्कृतिक गोष्टींवर नियंत्रण राखण्यात आले. विदेशातील चित्रपट, मालिका, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध प्रकारची माहिती या गोष्टी नागरिकांनी पाहण्यावर उत्तर कोरियात या कायद्याद्वारे बंदी घालण्यात आली होती. (वृत्तसंस्था)

‘मुले होतील भांडवलदारांची समर्थक’ n आपली मुले विविध माध्यमांत कोणते कार्यक्रम पाहतात यावर आई-वडिलांनी बारीक लक्ष ठेवले पाहिजे. n पालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले नाहीत तर ते भविष्यात भांडवलदारांचे समर्थक व समाजवादी विचारसरणीचे विरोधक बनतील, असे किम जाँग उन याच्या सरकारने म्हटले आहे.

दोन मुलांना दिली होती देहदंडाची शिक्षादक्षिण कोरियातील पारंपरिक नृत्य, गाणी यांचे कार्यक्रम उत्तर कोरियातील मुलांनी पाहू नये, यासाठी किम जाँग उन सरकार अधिक सतर्क असते. उत्तर कोरियातील एका शाळेतील २ विद्यार्थ्यांना गेल्या ६ डिसेंबरला नागरिकांसमोर गोळ्या घालून देहदंडाची शिक्षा दिली. यांनी द. कोरियातील अनेक नाटकांचे व्हिडीओ मित्रांना पाठवले हा त्यांचा ‘गंभीर’ गुन्हा होता.

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उन