शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची इच्छा असल्यास मध्यस्थी करेन, ट्रम्प यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 09:07 IST

जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात मध्यस्थी करण्याची इच्छा असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरला राग आळवला आहे.

वॉशिंग्टनः जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात मध्यस्थी करण्याची इच्छा असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरला राग आळवला आहे. मोदींची सांगितलं तर काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थीच मी तयार आहे, असे ट्रम्प म्हणाले आहेत. मी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केली आहे. मला वाटतं दोन्ही देशांनी एकत्र यायला हवं. मोदींनी ठरवलं तरच मी मध्यस्थी करेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. जर खरंच मोदींना वाटतं की, काश्मीर मुद्द्यावर कोणी तरी मध्यस्थता करायला हवी, तर आता त्यांनीच ठरवावं, मी या मुद्द्यावरून पाकिस्तान आणि  भारत या दोन्ही देशांशी चर्चा केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधली लढाई बऱ्याच काळापासून सुरू आहे. त्यामुळे ती आता संपवण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर वाद सोडवण्यासाठी मोदींनी माझ्याकडे मदत मागितल्याचा खुलासा ट्रम्प यांनी केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली होती, असा दावा ट्रम्प यांनी केला होता. त्याप्रमाणेच जम्मू-काश्मीरचा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचेही ट्रम्प त्यावेळी म्हणाले होते.  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांची भेट घेतली होती. या भेटीच्या नंतर ट्रम्प यांनी ही विधानं केली होती. इम्रान खान यांच्याशी बोलताना ट्रम्प म्हणाले होते की, माझी मदत हवी असल्यास सांगा, मी नक्कीच मध्यस्थी करेन. त्यावर इम्रान खान यांनी ट्रम्प यांच्या भूमिकेचे स्वागत केले. इम्रान खान यांनी स्वागत करताच ट्रम्प यांनी, ‘काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी मोदी यांनीही माझी मदत मागितली होती,’ असा दावा केला होता. त्यावरून भारतातही बराच वाद झाला होता.  तर दुसरीकडे इम्रान खान यांनी ट्रम्प यांच्या भूमिकेचे स्वागत केले होते, काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास अमेरिका तयार असल्यास आम्ही त्यांना नक्कीच सहकार्य करू, असंही त्यावेळी इम्रान खान म्हणाले होते. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पJammu Kashmirजम्मू-काश्मीर