शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 00:29 IST

Donald Trump News: थायलंड आणि कंबोडिया या देशांमध्ये एक प्राचीन मंदिर आणि सीमारेषेवरून संघर्षाची ठिणगी पडली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कंबोडिया आणि थायलंडच्या प्रमुखांशी फोन करून संघर्ष थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याबाबत चर्चा केली आहे.

आग्नेय आशियातील थायलंड आणि कंबोडिया या देशांमध्ये एक प्राचीन मंदिर आणि सीमारेषेवरून संघर्षाची ठिणगी पडली आहे. यादरम्यान, दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कंबोडिया आणि थायलंडच्या प्रमुखांशी फोन करून संघर्ष थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याबाबत चर्चा केली आहे. या युद्धामुळे अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे हा संघर्ष थांबवला पाहिजे. हे युद्ध मला भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या संघर्षाची आठवण करून देत आहे. तो संघर्ष यशस्वीरीत्या थांबवण्यात आला होता, असा दावाही ट्रम्प यांनी केला.

याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथवर या संदर्भात माहिती देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, थायलंडसोबत सुरू असलेलं युद्ध थांबावं यासाठी मी आताच कंबोडियांच्या पंतप्रधानांशी चर्चा केली. योगायोगाने आम्ही सध्या या दोन्ही देशांसोबत व्यापार कराराबाबत चर्चा करत आहोत. मात्र जर ते युद्ध करत राहिले तर आम्ही त्यांच्यापैकी कुणाशीही व्यापार करार करणार नाही. तसेच मी याबाबत दोन्ही देशांना स्पष्टच सांगितले आहे. कंबोडियासोबतची चर्चा पूर्ण झाली आहे. तसेच मी या गुंतागुंतीच्या परिस्थितीला सुलभ बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे, असेही ट्रम्प यांनी सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, मी थायलंडच्या काळजीवाहू पंतप्रधानांसोबतही चर्चा केली आहे. तसेच ही चर्चा सकारात्मक झाली आहे. कंबोडियाप्रमाणेच थायलंडलाही तातडीने शांतता आणि युद्धविराम हवा आहे. आता मी हा संदेश कंबोडियाच्या पंतप्रधानांकडे पोहोचवणार आहे.  दोन्ही देशांसोबत चर्चा केल्यानंतर युद्धविराम, शांतता आणि समृद्धी हा एक स्वाभाविक मार्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या काळात आपण याबाबत खूप काही पाहणार आहोत, असेही ते म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, जेव्हा सारं काही सुरळीत होईल आणि शांतता प्रस्थापित होईल तेव्हा मी या दोन्ही देशांसोबत व्यापारी कराराला अंतिम रूप देण्याच्या दिशेने पुढे जाण्यास उत्साहित आहे.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाThailandथायलंड