शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

"मी २०२४ ची निवडणूक हरलो तर शेअर बाजार कोसळेल", डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 20:00 IST

Donald Trump: अमेरिकेमध्ये यावेळी राष्ट्राध्यक्ष निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये रिपब्लिकन पार्टीकडून माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मैदानात उतरणार आहेत. त्याबरोबरच ट्रम्प हे आपल्या विजयाबाबतही निश्चिंत आहेत.  दरम्यान, डोनाल्ड ट्र्म्प यांनी मोठा दावा केला आहे.

अमेरिकेमध्ये यावेळी राष्ट्राध्यक्ष निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये रिपब्लिकन पार्टीकडून माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मैदानात उतरणार आहेत. त्याबरोबरच ट्रम्प हे आपल्या विजयाबाबतही निश्चिंत आहेत.  दरम्यान, डोनाल्ड ट्र्म्प यांनी मोठा दावा केला आहे. २०२४ च्या निवडणुकीत माझा विजय झाला नाही तर त्याचे परिणाम शेअर बाजारावर होतील.

आयोवा फॉक्स न्यूज टाऊन हॉलमध्ये अमेरिकन अर्थव्यवस्थेबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, माझ्या मते अमेरिकेमध्ये स्टॉक मार्केट सोडून अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट आहे. दरम्यान, स्टॉक मार्केटच्या सुस्थितीचं श्रेयही  ट्रम्प हे निवडणुकीच्या प्रचारात आपण राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर घेतलेला आघाडीला देतात.सध्या बाजारामध्ये जी तेजी दिसून येत आहे ती केवळ मी निवडणुकीत आघाडी घेतल्याने दिसत आहे, असं ट्रम्प सांगतात. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत आपल्याला विजय न झाल्यास मोठं संकट येण्याची भविष्यवाणीही केली आहे.  नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत विजय मिळण्याची खात्री असलेल्या ट्रम्प यांनी सांगितले की, जर मी २०२४ ची निवडणूक जिंकली नाही तर स्टॉक मार्केट क्रॅश होईल. तसेच पुढच्या  १२ महिन्यांच्या आत देशाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी या कार्यक्रमात सहभागी होताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. जेव्हा त्यांना शेअर बाजारामधील तेजी आणि १२ महिन्यांमधील आर्थिक मंदीबाबत केलेल्या भविष्यवाणीबाबत विचारले असता डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की,  मी कुठल्याही दुर्घटनेची अपेक्षा करत नाही आहे, मात्र मी अर्थव्यवस्थेच्या नाजूक स्थितीबाबत आपली चिंता व्यक्त केलेली आहे.   

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाStock Marketशेअर बाजार