शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

चीनने मसूद अजहरला पाठिंबा दिल्यास भारत उचलणार कडक पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 08:29 IST

दहशतवादी मसूद अजहर आणि त्याची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदसंबंधी चीन येत्या काही दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - दहशतवादी मसूद अजहर आणि त्याची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदसंबंधी चीन येत्या काही दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. चीनने घेतलेल्या निर्णयाच्या आधारावर भारत पुढचं पाऊल उचलणार आहे. चीनने 31 मार्च रोजी मसूद अजहरला दहशतवादी घोषित करण्यापासून रोखत आडकाठी केली होती. मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यास चीनने विरोध केला होता. चीन केलेल्या या विरोधावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. चीनने केलेला विरोध हा फक्त तांत्रिक आधारावर घेतला गेला असून अनाकलनीय असल्याची टीका भारताने केली होती. 
 
(मसुद अजहरला संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी यादीत टाकण्यास चीनचा विरोध)
 
 
मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी घोषित केलं असतं तर त्याची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली असती. इतकंच नाही तर त्याच्या दौ-यांवरही बंदी आली असती.
 
चीनने प्रतिबंध करण्याचा  (व्हेटो) अधिकार वापरत हा विरोध केला होता. संयुक्त राष्ट्र समितीच्या पाच सदस्यांकडे (व्हेटो) प्रतिबंध करण्याचा अधिकार आहे. यामध्ये चीनचादेखील समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत पाच कायम सभासद राष्ट्रे (अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, चीन, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स) आहेत. त्या प्रत्येकास हा खास अधिकार या संघटनेच्या सनदेने दिलेला आहे.
 
(मसुद अजहरला दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याची भारताची मागणी)
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनने निर्णय घेतल्यानंतर भारताने काय पावलं उचलायची याची तयारी करुन ठेवली आहे. भारताकडून मसूद अजहरचा भाऊ अब्दुल रौफ असगर, लष्कर-ए-तयब्बा आणि जैश-ए-मोहम्मदच्या इतर दहशतवाद्यांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (एनआयए) मसूद अजहर हाच पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचा खुलासा केला होता, ज्यानंतर भारताने कारवाईला सुरुवात केली होती. 
 
चीनने जर आपला निर्णय पुढे नेला नाही तर मसूद अजहरला आपोआप दहशतवादी घोषित करण्यात येईल. सोबतच त्याची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदची प्रतिबंध घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत नोंद होईल. पण जर चीन आपल्या निर्णयावर कायम राहिला तर समितीला विचार करण्यासाठी वेळ घ्यावा लागेल. यावर्षी 5 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभल यांनी चीनच्या सुरक्षा सल्लागारांशी बातचीत केली होती तेव्हा चीनने आपण निर्णय बदलणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. 
 
चीनने मसद अजहर आणि जैश-ए-मोहम्मदसंबंधी आपली भूमिका स्पष्ट न केल्यास हे त्यांच्या प्रतिमेला घातक ठरु शकतं. दहशतवादी लढताना दुटप्पी भूमिका तसंच राजकीय फायदा घेतला गेला नाही पाहिजे असं चीनने म्हटलं होतं. जर चीनने मसूद अजहरला विरोध केला नाही तर चीन आपल्याच भूमिकेविरोधात जाताना दिसणार आहे.