शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

देश सध्या संकटात, आधीच्या पंतप्रधानांकडून झालेल्या चुका सुधारणार; PM होताच ऋषी सुनक स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 20:15 IST

भारतीय वंशाचे ४२ वर्षीय ऋषी सुनक अखेर ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. सुनक यांनी आज बकिंघम पॅलेसमध्ये प्रिन्स चार्ल्स यांची भेट घेतली.

ब्रिटन-

भारतीय वंशाचे ४२ वर्षीय ऋषी सुनक अखेर ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. सुनक यांनी आज बकिंघम पॅलेसमध्ये प्रिन्स चार्ल्स यांची भेट घेतली. प्रिन्स चार्ल्स यांनी सुनक यांना अपॉइंटमेंट लेटर सुपूर्द करत त्यांना नवं सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं. प्रिन्स चार्ल्स आणि सुनक यांची भेट पॅलेसच्या रुम नंबर १८४४ मध्ये झाली. परंपरेनुसार सुनक हे त्यांच्या खासगी कारमधून बकिंघम पॅलेसमध्ये पोहोचले होते. 

प्रिन्स चार्ल्स यांच्याकडून पंतप्रधानपदाचं अपॉइंटमेंट लेटर मिळाल्यानंतर ऋषी सुनक पंतप्रधानांच्या अधिकृत कारमधून पीएमच्या अधिकृत निवासस्थान असलेल्या रेसिडेन्स १० डाऊनिंग स्ट्रीट येथे पोहोचले. याठिकाणी त्यांनी ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा संबोधित केलं. ऋषी सुनक यांनी आपल्या संबोधनात देश संकटात असल्याचं मान्य करत आधीच्या पंतप्रधानांनी केलेल्या चुका सुधारणार असल्याचं मोठं विधान केलं आहे. 

"मी नुकताच प्रिन्स चार्ल्स यांची भेट घेऊन आलो. त्यांनी मला नवं सरकार स्थापन करण्यास सांगितलं आहे. तुम्हाला सर्वांना माहितच आहे सध्या आपण आर्थिक पातळीवर संकटाचा सामना करत आहोत. कोविडमुळे याआधीच आपण आव्हानाचा सामना करत आहोत. त्यात पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करुन परिस्थिती आणखी खराब केली आहे. माजी पंतप्रधान लिझ ट्रस परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांनी न थकता काम केलं, पण काही चुका देखील झाल्या. आता त्या चुका सुधारण्याचं काम आम्ही करू", असं ऋषी सुनक म्हणाले. 

देशाला एकसंध करुन दाखवेन"मी या देशाला पुन्हा एकदा एकसंध करुन दाखवेन. मी हे फक्त बोलत नाहीय. तर करुनही दाखवेन. दिवस-रात्र तुमच्यासाठी काम करेन. २०१९ साली कंझर्व्हेटिव्ह पार्टीला समर्थन मिळालं होतं. ते काही एका व्यक्तीसाठी समर्थन नव्हतं. हेल्थ, बॉर्डर प्रोटेक्शन आणि आर्म्ड फोर्सेससाठी काम केलं जाईल. आज आपल्यासमोर अनेक आव्हानं आहेत. चान्सलर म्हणून मी आजवर जी कामं केली आहेत ती यापुढेही सुरू ठेवेन. लोकांचं हित पक्षीय राजकारणापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. गमावलेला विश्वास पुन्हा प्राप्त करुन दिला जाईल. रस्ता खूप कठीण आहे पण आपण नक्कीच यशस्वी होऊ", असं ऋषी सुनक म्हणाले. 

टॅग्स :Rishi Sunakऋषी सुनकunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ