अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान तणावावर विधान केले आहे. 'व्यापार करारामुळे हा तणाव कमी झाला आहे, दोन्ही देशांमधील परिस्थिती गंभीर होती. अण्वस्त्रांनी सज्ज असलेले देश एकमेकांविरुद्ध कारवाई करत होते. विमानांना लक्ष्य केले जात होते. मला वाटते की ५ विमाने पाडली असतील',असा दावा ट्रम्प यांनी केला.
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
"आम्ही अनेक युद्धे थांबवली आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत होता. आम्ही तो व्यापाराद्वारे सोडवला. आम्ही म्हटले होते की जर तुम्ही शस्त्रे आणि कदाचित अण्वस्त्रे वापरली तर आम्ही तुमच्याशी व्यापार करार करणार नाही",असंही ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा नाश करण्याबाबत विधान केले आणि त्यात आम्ही महत्त्वाची भूमिका बजावली असे सांगितले.
यापूर्वीही ट्रम्प यांनी दावा केला होता
ट्रम्प यांनी यापूर्वीही याबाबत दावा केला होता. "भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष व्यापाराच्या माध्यमातून थांबवला आहे, जो अणुयुद्धात बदलू शकला असता, असंही ट्रम्प म्हणाले. ओव्हल ऑफिसमध्ये नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांच्याशी झालेल्या बैठकीत ट्रम्प म्हणाले, 'युद्धांदरम्यान उपाय शोधण्यात आपण खूप यशस्वी झालो आहोत. भारत आणि पाकिस्तानचे उदाहरण तुमच्यासमोर आहे. रवांडा आणि काँगो युद्ध आहे जे ३० वर्षांपासून चालू होते.' भारत आणि पाकिस्तान ज्या पद्धतीने पुढे जात होते, त्यामुळे पुढील आठवड्यात त्यांच्यात अणुयुद्ध झाले असते. परिस्थिती खूप वेगाने बिकट होत चालली होती आणि आम्ही हे व्यापाराच्या माध्यमातून केले. मी म्हणालो होतो की जोपर्यंत तुम्ही हा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्याशी व्यापाराबद्दल बोलणार नाही आणि त्यांनी तसे केले',असंही ट्रम्प म्हणाले.