शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आय फॉर इंडिया, आय फॉर इस्रायल, मोदींच्या मैत्रीचा नवा मंत्र

By admin | Updated: July 5, 2017 17:06 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती रुवेन रिलविन यांची भेट घेतली आहे

ऑनलाइन लोकमतजेरुसलेम, दि. 5 - इस्रायलच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती रुवेन रिलविन यांची भेट घेतली. राष्ट्रपती रिलविन यांनी प्रोटोकॉल तोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आदरातिथ्य केलं. त्यानंतर मोदी आणि रिलविन या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पांढ-या सूटसह निळ्या रंगाचा रुमाल बाळगला होता. खरं तर इज्रायल ध्वजाचा रंगही पांढरा आणि निळा आहे. त्यामुळेच मोदींनी तो पोशाख परिधान केलाय. मोदींच्या या भेटीत दोन्ही देशांमध्ये जवळपास 17 हजार कोटी रुपयांचे करार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या इस्त्रायल दौ-यावर आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता मोदी बेन गुरियन विमानतळावर दाखल झाल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी प्रोटोकॉल तोडून विमातळावर मोदींचं स्वागत केलं होतं. नेत्यानाहू मोदींचं स्वागत करताना हात जोडून नतमस्तक होत. आपका स्वागत है मेर दोस्त असं हिंदीत म्हणालेसुद्धा होते.

आणखी वाचा(फुलाला दिलं "मोदी" नाव, इस्त्रायलने केला पंतप्रधानांचा सन्मान)("आपका स्वागत है मेरे दोस्त", मोदींचं इस्त्रायलमध्ये हिंदीत स्वागत)इस्रायलला भारतीय संस्कृती , इतिहास , लोकशाहीविषयी प्रेम आहे आणि हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भारत आणि इस्रायली लोकांची गुणवत्ता हा दोन्ही देशांमधील समान धागा आहे, त्यामुळे आमची भागीदारी यशस्वी ठरेल, असा विश्वास नेत्यानाहू यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील स्वतःच्या भाषणाची सुरुवात हिब्रू भाषेत केली होती. भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि सुरक्षेसाठी भागीदारी करत आहेत. दोन्ही देश आपापल्या नागरिकांना दहशवादाच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करत आहेत, असंही मोदी म्हणाले होते.भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये शेती, पशुपालन, संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये व्यापारी संबंध आहेत. मौल्यवान खडे, तंत्रज्ञान, रसायने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, प्लास्टीक, खते, कपडे, औषधे अशा अनेक वस्तूंची आयात निर्यात हे देश करत असतात. या दोन्ही देशांनी २०१४ साली ४.५२ अब्ज डॉलर्सचा व्यापार (संरक्षण क्षेत्रातील खरेदी-विक्री वगळून) केला आहे. इस्रायलमध्ये तयार होणारे संरक्षण साहित्य खरेदी करणारा भारत हा सर्वात मोठा देश आहे.भारत आणि इस्रायल यांचे संबंध आज इतक्या वेगाने सुधारत असले तरी हा वेग गेल्या 70 वर्षांमध्ये कायम नव्हता. 1947 साली पॅलेस्टाइनचे विभाजन करण्याविरोधात भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये मत दिले होते. त्याचप्रमाणे इस्रायलच्या यूएनमधील प्रवेशासही भारताने 1949 साली विरोध केला होता. 1950 साली भारताने इस्रायलला कायदेशीर मान्यता दिली. याबाबत बोलताना भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु म्हणाले होते, ही मान्यता आम्ही यापुर्वीच देऊ शकलो असतो, पण मध्यपुर्वेतील आमच्या अरब मित्रांना न दुखावण्याची आमची इच्छा होती. 1953 साली इस्रायलला मुंबईत वाणिज्य दुतावास उघडण्याची परवानगी मिळाली. 1950 ते 1990 या काळात भारत आणि इस्रायल यांचे संबंध अनौपचारिक स्वरुपाचे राहिले. अर्थात या काळामध्ये विविध आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर दोन्ही देशांचे नेते भेटत होतेच. 1992 साली दोन्ही देशांनी मुत्सद्दी पातळीवरचे संबंध प्रस्थापित केले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन भारतात आले, त्यानंतर हे संबंध अधिक वाढीस लागले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने ते सर्वाधीक चांगल्या स्थितीत आहेत असे म्हणावे लागेल.भारत-इस्रायल यांच्यांमधील राजनैतिक संबंध 1992 - दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित

1997- इस्रायलचे राष्ट्रपती एझर वाइझमन यांची भारताला भेट
 
2000- उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांची इस्रायलला भेट
 
2003- इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांची भारतास भेट
 
2006- तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार, कपिल सिब्बल, कमलनाथ यांची  इस्रायल भेट
 
2012- परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची इस्रायलला भेट
 
2014- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेत्यानाहू यांची न्यू यॉर्कमध्ये भेट. 
 
2014- ट्वीटरवर नरेंद्र मोदी यांनी हिब्रूमधून हनुक्का या ज्यू सणाच्या शुभेच्छा दिल्या, त्याला नेत्यानाहूंचा हिंदीतून प्रतिसाद
 
2014- गृहमंत्री राजनाथ सिंह यांची इस्रायलला भेट
 
2015- इस्रायलचे परराष्ट्रमंत्री मोशे यालोन यांची भारत भेट (पंतप्रधानांशीही संवाद)
 
2015- भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पॅलेस्टाइन आणि इस्रायलला भेट. इस्रायलची संसद नेसेटमध्ये भाषण. असे भाषण देणारे व इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती
 
2016 - जानेवारी महिन्यामध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इस्रायलला भेट दिली. यावेळेस इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी चर्चा केली.
 
2016- नोव्हेंबर महिन्यामध्ये इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रियुविन रिवलिन यांनी भारताला भेट दिली. यावेळेस त्यांनी मुंबईत खाबाद हाऊसलाही भेट दिली.