तुर्कीहून मुंबईला जाणारे प्रवासी इस्तांबूलमध्ये अडकले आहेत. इंडिगोचे सुमारे ४०० प्रवासी इस्तंबूल विमानतळावर २४ तास अडकले आहेत. विमान कंपनीने ऑपरेशनल कारणांमुळे उड्डाणाला उशीर झाल्याचे सांगितले. सोशल मीडियावर प्रवाशांनी इंडिगोवर टीका केली. इंडिगोच्या काही प्रवाशांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि LinkedIn वर दावा केला की, फ्लाइटला आधी विलंब झाला आणि नंतर कोणतीही सूचना न देता रद्द करण्यात आले.
अनुश्री भन्साळी यांनी सांगितले की, फ्लाइटला एक तासाने दोनदा उशीर झाला, नंतर रद्द करण्यात आले आणि शेवटी १२ तासांनंतर त्यांचे वेळापत्रक बदलले. काही प्रवाशांनी सांगितले की, फ्लाइटला उशीर होत असूनही, इंडिगोने निवास, फूड व्हाउचर दिलेले नाहीत आणि विमानतळावरील इंडिगो प्रतिनिधीनेही त्यांच्याशी संपर्क साधला नाही.
रोहन राजा या प्रवाशाने सांगितले की, दिल्लीहून सकाळी ६.४० वाजता निघालेले फ्लाइट रद्द केल्यानंतर, लोकांना थंडीचा सामना करावा लागला कारण एअरलाइनने त्यांना दिलेल्या निवासस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी कोणतेही वाहन दिले नाही.
कंपनीने सूचना दिली नाही
पार्श्व मेहता यांनी लिहिले की, रात्री ८ वाजताची फ्लाइट रात्री ११ वाजेपर्यंत आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आले. शिवाय, इंडिगोकडून कोणतीही घोषणा न झाल्यामुळे आणि तुर्की एअरलाइन्सच्या क्रूकडून कोणतीही माहिती न मिळाल्याने गोंधळ उडाला.
प्रवाशांच्या तक्रारींना उत्तर देताना, एअरलाइनने सांगितले की, ऑपरेशनल कारणांमुळे फ्लाइटला उशीर झाला आणि आम्ही त्याबद्दल दिलगीर आहोत.