शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जगभरात माणसं पिंजऱ्यात, प्राणी रस्त्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 16:04 IST

माणसं घरांच्या पिंजऱ्यात आणि प्राणी कधी नव्हे ते रस्त्यावर निवांत फिरत आहेत. अगदी पक्षी रस्त्यावर उतरले आहेत. गायी, श्वान, रस्त्यावर निवांत झोपल्या आहेत.

ठळक मुद्देअनेकांना आता स्वत:चं अन्न शोधता येत नाही.

आपल्या देशात एरव्ही माणसांच्या जिवाची किंमत काय आहे? हजारोंनी जत्थ्थे निघालेत गावांकडे, त्यांचे हाल कोण विचारतं? गेल्या वर्षभरांत शेतकरी आत्महत्यांची संख्या काढा, तो आकडा अंगावर येईल. रस्ते अपघात?- त्यात दगावणारी माणसं, जखमी होणारी माणसं यांची संख्याही मोठी आहे.त्यामुळे कोरोनाच्या याकाळात त्या आकडेवारीकडेही लक्ष  द्यायला हवी. सगळा देश लॉकडाऊनमध्ये असताना आणि यंत्रणोवर आधीच कामाचा इतका ताण असताना पुरेशी आकडेवारी सध्या मिळणं शक्य नाही. मात्र तरीही एक अंदाज घेतला तर काय चित्रं दिसतं?ते चित्र असं म्हणतं की, दिवसाला भारतात सरासरी 41क् लोक रस्ते अपघातात दगावतात. जे जखमी होतात, त्यांची संख्या वेगळी. अगदी ढोबळ अंदाज लावायचा म्हटला तरी लॉकडाऊनमुळे रस्ते वाहतूक बंद असल्याने किमान 35क् लोकांचे जरी प्राण वाचतात असं ग्ृहित धरलं तरी 21 दिवसांत किती लोकांचे प्राण वाचले याचा अंदाज काढा.व्हॉट्सअॅपवर फिरणा:या विनोदासारखं नाही, ही वस्तुस्थिती आहे कारण जगभरात सर्वाधिक माणसं भारतातच रस्ते अपघातात दगावतात.दुसरा एक या काळाचा फायदा दाखवणारे काही फोटो सध्या व्हायरल आहेत. केरळमध्ये तर एक सांबर रस्ता  क्रॉस करत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. माणसं घरांच्या पिंज:यात आणि प्राणी कधी नव्हे ते रस्त्यावर निवांत फिरत आहेत. अगदी पक्षी रस्त्यावर उतरले आहेत. गायी, श्वान, रस्त्यावर निवांत झोपल्या आहेत.हे चित्र खरोखरच वेगळं आहे. 

या शहरांवर, इथल्या जगण्यावर प्राण्यांचाही तेवढाच हक्क आहे, हे तरी निदान यानिमित्तानं समोर आलं.अर्थात यासा:यात काही भली माणसंही आहेतच. रस्त्यावर राहणारे श्वान, फिरणा:या गायी यांना खायला कोण घालणार असं म्हणत अनेकांनी फेसबूक कॅम्पेन सुरु केल्या आहेत. ब:याच प्राणीमित्रंचं म्हणणं की मुख्यत: श्वानांना आयतं खायला घालून माणसांनीच त्यांच्या सवयी बिघडवल्या, अनेकांना आता स्वत:चं अन्न शोधता येत नाही.तर जरा आपल्या परिसरात, श्वानांना अन्न मिळेल असंही पहा!जरा शांत, स्थिर जगणं यानिमित्तानं माणसांच्या वाटय़ाला आलं आहे, ते टिकेल की पुन्हा रिव्हर्स गिअर टाकेल याचं उत्तर येणारा काळ देईलच!