शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बख्खळ कमाई करतात हे दोन कुत्रे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 07:57 IST

ह्यूगो आणि हक्सले हे दोघे मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत.

ह्यूगो आणि हक्सले हे दोघे मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत. ते यूट्यूबवर आहेत. टिकटॉकवर आहेत. इन्स्टाग्रामवर आहेत. ते मॉंक्लेअर, प्राडा आणि ॲन्या हाईन्डमार्च यांसारख्या लक्झरी ब्रॅंडस्साठी मॉडेल म्हणून काम करतात. ते जाहिराती करतात. ते फॅशन शोज करतात. ते मोठ्या हॉटेल्समध्ये राहतात आणि त्यांनी हे सगळे केल्यामुळे त्यांच्या मालकिणीला, उर्सुला एचसन हिला दरवर्षी १,००,००० पाउंड्स म्हणजेच साधारण एक कोटी रुपये उत्पन्न मिळते. मालकिणीला इतके पैसे कमावून देणारे ह्युगो आणि हक्सले कोण आहेत? तर ती आहेत गोल्डन रिट्रिव्हर जातीची कुत्री! आणि ती ज्या जाहिराती करतात त्यात माणसांसाठीची उत्पादनं तर असतातच; पण प्राण्यांसाठीची उत्पादनेसुद्धा असतात. त्यात प्रामुख्याने कॉलर्स, जॅकेट्स आणि हार्नेस या वस्तूंच्या जाहिरातींमध्ये त्यांना खूप मागणी आहे.

कोणी म्हणेल की, माणसांसाठीच्या जाहिरातींमध्ये कुत्रे वापरणं एक वेळ ठीक आहे. लोकांना एकूणच छान वागणाऱ्या कुत्र्यांबद्दल आणि एकूणच पाळीव प्राण्यांबद्दल फार प्रेम असतं. त्यामुळे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी माणसांच्या जाहिरातीत कुत्रा दिसतो, पण पाळीव प्राण्यांसाठीच्या उत्पादनांसाठी एवढे पैसे कोण देईल? किती झालं, तरी कुत्रे किंवा मांजर यांना लागून-लागून काय लागणार? फार-फार तर गळ्यातला पट्टा नाहीतर खाण्याचा वाडगा! पण तसं नाहीये. जगभरात एकूण जे प्राणी पाळले जातात त्यांच्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची बाजारपेठ प्रचंड मोठी आहे. इतक्या मोठ्या बाजारपेठेचा हिस्सा असलेले ह्युगो आणि हक्सले हे मुळात या व्यवसायात आले कसे? हे काही सहज घडलं नाही. ती एक फारच इंटरेस्टिंग गोष्ट आहे.

मुळात उर्सुला एचसन ही विविध उत्पादनांसाठी फोटोग्राफी करायची. इतर लोकांच्या कुत्र्यांना एका जागी बसवून त्यांचे फोटो काढणं हा तिच्या कामाचा भाग होता. पण व्हायचं काय की, आलेले कुत्रे स्वभावाने चंचल असत. ते एका जागी बसायचे नाहीत. पटकन सांगितलेलं ऐकायचे नाहीत. अशा वेळी उर्सुला हक्सलेला तिथे घेऊन जायची. त्याच्या शांत वागण्यामुळे मॉडेल असलेला कुत्राही शांत व्हायचा. उर्सुलाच्या लक्षात आलं की, बऱ्याच वेळा मॉडेलपेक्षा हक्सले एका जागी जास्त वेळ बसू शकतो, तो जास्त आज्ञाधारक आहे. मग तिने त्याचेच फोटो काढून एजन्सीजकडे पाठवायला सुरुवात केली. त्याला कामही मिळायला लागलं. आता ह्युगो आणि हक्सले हे जगातले मोठे पेट इन्फ्लुएन्सर्स झाले आहेत. ते आता इतके बिझी असतात की, त्यांना शूटिंगसाठी घेऊन जाणं, त्यांची काळजी घेणं हेच उर्सुलाचं मुख्य काम झालेलं आहे.

पण ह्युगो आणि हक्सले हे काही जगातले पहिले पेट इन्फ्लुएन्सर्स नाहीत. पहिला पेट इन्फ्लुएन्सर पाळीव प्राणी हा मुळात कुत्रा नव्हताच, तर ती होती एक मांजर. तिचं खरं नाव टार्डर सॉस असलं तरी तिचं इंटरनेटवरचं नाव होतं, द ग्रंपी कॅट. तिच्या जबड्याच्या विशिष्ट ठेवणीमुळे ती कायमच वाईट मूडमध्ये असल्यासारखी दिसायची आणि त्यामुळेच तिचं हे नाव पडलं होतं; पण असं असलं तरी ती अतिशय प्रसिद्ध होती. तिच्यावर १००० हून जास्त मीम्स बनवली गेली आहेत. तिच्या नावाची पुस्तकं, तिच्यावर बेतलेली उत्पादनं; इतकंच नाही, तर तिची स्वतःची फिल्मसुद्धा आली होती. ही ग्रंपी कॅट इतकी प्रसिद्ध होती, ती २०१९ साली मेल्यानंतरदेखील तिच्या इन्स्टाग्राम पेजला २६ लाख फॉलोअर्स आहेत. तेव्हापासून पेट इन्फ्लुएन्सरचे फॉलोअर्स कमी झालेले नाहीत.

आजच्या घडीचा अतिशय प्रसिद्ध पेट इन्फ्लुएन्सर म्हणजे टकर द गूफी गोल्डन रिट्रीव्हर. याचे इन्स्टाग्रामवर ३३ लाख फॉलोअर्स आहेत. इतकंच नाही तर यंदाचं वर्ष हे चिनी समजुतीप्रमाणे सशांचं वर्ष आहे. त्यामुळे या वर्षी ससे आणि त्यासंबंधीच्या बाजारात एकूणच उलाढाल वाढलेली आहे. कुत्रा काय, मांजर काय आणि ससा काय… सहज बघताना जरी ‘साधे पाळीव प्राणी’ वाटत असले तरी त्यांची बाजारपेठ प्रचंड मोठी आहे, यात शंका नाही. 

पाळीव प्राणी वापरतात करोडोंच्या वस्तूस्कायक्वेस्ट नावाच्या रिसर्च कंपनीच्या अभ्यासातून असं दिसून आलं, की ही जागतिक बाजारपेठ तब्बल ४.६ बिलियन पाउंड्स एवढी मोठी आहे. आता एक बिलियन म्हणजे किती? तर एकावर नऊ शून्य ! असे ४ बिलियन पाउंड्स इतकी वार्षिक उलाढाल पाळीव प्राण्यांच्या वस्तूंच्या विक्रीतून जगात होत असते. म्हणजे किती रुपये? - करा गणित...