शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Howdy Modi: 'मोदींच्या नेतृत्वात जग मजबूत, संपन्न भारत घडताना पाहत आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 06:44 IST

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे गौरवोद्गार

ह्युस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे सर्वात मोठे आणि सर्वात सच्चे मित्र आहेत, अशा शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींबाबत गौरवोद्गार काढले. ह्यूस्टनमधील खचाखच भरलेल्या एनआरजी स्टेडियममधील नागरिकांना ट्रम्प यांनी संबोधित केले.ट्रम्प म्हणाले की, मोदी हे भारतासाठी असामान्य काम करत आहेत. गत महिन्यात ६९ वर्षांचे झालेल्या पंतप्रधान मोदी यांना ट्रम्प यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, मोदी यांच्या नेतृत्वात जग मजबूत, संपन्न आणि सार्वभौम भारत पहात आहे. आज आमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहेत. लोकशाहीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगून ट्रम्प म्हणाले की, आपल्या राष्ट्राला पहिल्यापेक्षा अधिक समृद्ध बनविण्यासाठी मोदींसोबत काम करण्यासाठी आपण तत्पर आहोत.ट्रम्प म्हणाले की, संरक्षण संबंध मजबूत करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच संरक्षण करारांवर स्वाक्षरी केली जाईल. सीमा सुरक्षा अमेरिका आणि भारत दोघांसाठी महत्वाची आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एनआरजी स्टेडियमवर भव्य स्वागत करण्यात आले. दोन्ही हात जोडून मोदी व्यासपीठावर पोहोचले.कार्यक्रमात स्पर्श शहाचे राष्ट्रगीतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येथील ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात स्पर्श शहा (१६) या युवकाने रविवारी राष्ट्रगीताचे गायन केले. अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये राहणारा स्पर्श हा भारतीय वंशाचा आहे. शहा याला जन्मत:च ठिसूळ हाडांचा आजार (ऑस्टेओजिनिसिस इर्म्पफेक्टा) आहे.त्याला चाकांच्या खुर्चीतच बसून राहावे लागते. स्पर्श शहा याने तोंड देत असलेली प्रतिकूलता कला जोपासण्यात अडथळा ठरू दिली नाही. स्पर्श हा गायक, गीतलेखक आणि प्रेरणादायी वक्ता आहे.वैष्णव जन तो...मोदी यांच्या भाषणापूर्वी अमेरिकेतील भारतीयांनी ‘वैष्णव जन तो’ हे भजन सादर केले. महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त हे भजन गायले गेले.

टॅग्स :Howdy Modiहाऊडी मोदीNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प