शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

Howdy Modi : मोदींना पाहावी लागली तासभर वाट, ट्रम्प यांच्या उशिरा येण्यामागे हे होतं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 08:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी अमेरिकेतल्या ह्युस्टनमध्ये झालेल्या आयोजित हाऊडी मोदी कार्यक्रमात 50 हजार लोकांना संबोधित केलं आहे.

ह्युस्टनः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी अमेरिकेतल्या ह्युस्टनमध्ये झालेल्या आयोजित हाऊडी मोदी कार्यक्रमात 50 हजार लोकांना संबोधित केलं आहे. एनआरजी स्टेडियम खचाखच भरलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांना मोदींनी आपल्या भाषणानं मंत्रमुग्ध केलं. तसेच भारताच्या प्रगतीचा आलेख दाखवला. परंतु या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एक तासांहून अधिक विलंबानं पोहोचले. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फार काळ वाट पाहावी लागली. ह्युस्टनमध्ये एनआरजी स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण रात्री 9.20 वाजताच्या दरम्या सुरू झालं. तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संबोधित करणार होते. परंतु ते Howdy Modi कार्यक्रमात रात्री 10.25 वाजता पोहोचले. म्हणजे ते एक तास पाच मिनिटं उशिरानं कार्यक्रमात दाखल झाले. ह्युस्टनमध्ये आलेल्या पुराचा आढावा घेण्यासाठी ट्रम्प यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली होती. त्यानंतर ते हाऊडी मोदी कार्यक्रमात दाखल झाल्याचं सांगण्यात आलं आहे. ह्युस्टनमधल्या पूरग्रस्त भागात 5 लोकांना जीव गमवावा लागला आहे. 'Howdy Modi' कार्यक्रमाला येण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटसुद्धा केलं होतं. ह्युस्टनमध्ये मी माझ्या मित्रासोबत असेन, 'Howdy Modi' या कार्यक्रमामुळे दिवस शानदार राहणार असल्याचं ट्रम्प म्हणाले होते. ह्युस्टन येथील एनआरजी स्टेडियममध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायासमोर भाषणाला मोदींनी हिंदीतून सुरूवात करतानाच तेथील जनसमुदाय, उत्साह, जल्लोष याचा उल्लेख केला. हे दृश्य, हा माहोल अकल्पनीय आहे. टेक्सासच्या इतिहासात हे अविश्वसनीय आहे. हा अपार जनसमूह उपस्थित आहे. ही संख्या गणितात मोजता येणारी नाही. नवा इतिहास घडतो आहे. ट्रम्प यांचे येणे हे अमेरिकेच्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. अमेरिकेत भारताच्या सामर्थ्याचा डंका आहे. १३० कोटी भारतीयांचा हा सन्मान आहे. लोकप्रतिनिधी व अनेक जण येथे आलेले आहेत. सर्वांचे स्वागत व अभिनंदन. येथे येण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी नोंदणी केली होती. हजारोंना येथे येता आले नाही. त्यांची मी माफी मागतो.

  • अब की बार ट्रम्प सरकार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनआरजी स्टेडियममध्ये ट्रम्प यांना भाषणासाठी आमंत्रित केले. यावेळी त्यांनी अब की बार ट्रम्प सरकार हा नाराही दिला. मोदी म्हणाले की, ट्रम्प यांचा कोणताही परिचय करून देण्याची गरज नाही. मी त्यांचे नेतृत्व, अमेरिकेबाबतची त्यांची प्रबळ इच्छा व अमेरिकेची वाटणारी त्यांना चिंता याबाबत मी त्यांची प्रशंसा करतो. मी जेव्हा त्यांना प्रथम भेटलो तेव्हा त्यांनी सांगितले होते की, भारताचा सच्चा मित्र व्हाईट हाऊस आहे. न्यू जर्सी ते न्यू दिल्ली, ह्युस्टनपासून हैदराबादपर्यंत, बोस्टनपासून बेंगळुरूपर्यंत, शिकागोपासून शिमलापर्यंत आणि लॉस एंजिल्सपासून लुधियानापर्यंत भारत आणि अमेरिकेचे संबंध मानवीय आहेत, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पHowdy Modiहाऊडी मोदी