शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

Howdy Modi: मोदींनी मनं जिंकली, अमेरिकेत ‘हाउडी मोदी’चा गजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 06:42 IST

स्वच्छतेबद्दल मोदी थेट कृतीही करतात; जमिनीवर पडलेले फूल उचलले; नेटिझन्सनी केली मोठी प्रशंसा

ह्युस्टन : स्वच्छतेसाठी सतत आग्रह धरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण फक्त बोलतच नसून प्रत्यक्ष कृतीही करतो हे दाखवून नेटिझन्सची मने जिंकली. मोदी यांचे शनिवारी येथे जॉर्ज बुश इंटरकॉन्टिनेंटल विमानतळावर ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमासाठी आगमन झाल्यावर अमेरिकन उच्चपदस्थाने त्यांना पुष्पगुच्छ भेट दिल्यावर त्यातील एक फूल खाली पडले आणि तेथील उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला, कारण ते फूल मोदी यांनी स्वत: उचलले तेव्हा त्यांच्या या कृतीची समाज माध्यमांवर प्रशंसा झाली.‘मोदी यांनी त्यांना भेट दिल्या गेलेल्या पुष्पगुच्छातील फूल किंवा त्याची जमिनीवर पडलेली दांडी उत्स्फूर्तपणे उचलून त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्याकडे दिली. किती हा साधेपणा’, असे एका युझरने टिष्ट्वटरवर म्हटले. मोदी यांना बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचा स्वच्छतेच्या क्षेत्रात ‘स्वच्छ भारत अभियान’च्या माध्यमातून नेतृत्वासाठी ‘ग्लोबल गोलकीपर्स अवॉर्ड’ प्रदान केला जाणार आहे. दोन आॅक्टोबर, २०१४ पासून स्वच्छ भारत अभियानाला प्रारंभ झाला तेव्हापासून देशात १० कोटींपेक्षा जास्त स्वच्छतागृहे बांधली गेली आहेत. स्वच्छ भारत अभियान हे इतर देशांसाठीही मार्गदर्शक ठरू शकते. कारण जगातील अत्यंत गरीब व्यक्तींना या मोहिमेतून स्वच्छतागृह तातडीने उपलब्ध करून दिले जाऊ शकते. (वृत्तसंस्था)नवा काश्मीर उभारू; नरेंद्र मोदींचे काश्मिरी पंडितांना आश्वासनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सदस्यांच्या काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाची येथे विशेष भेट घेऊन प्रत्येकासाठी असेल असा ‘नवा काश्मीर’ उभारण्याचे आश्वासन त्यांना दिले. या शिष्टमंडळात अमेरिकेत राहणाºया काश्मिरी पंडितांचा समावेश होता.मोदी यांचे अमेरिकेच्या सात दिवसांच्या दौºयावर येथे आगमन झाल्यावर ही भेट झाली. ‘काश्मीरमध्ये नवे वारे वाहत असून, आम्ही सगळे एकत्र येऊन प्रत्येकासाठी असेल असा नवा काश्मीर बनवू’, असे मोदी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा मिळालेला घटनेतील अनुच्छेद ३७० गेल्या पाच ऑगस्ट रोजी रद्द करून जम्मू आणि काश्मीर व लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण केले.गेली ३० वर्षे संयम दाखविल्याबद्दल मोदी यांनी काश्मिरी पंडितांचे आभारही मानले. ‘माझी काश्मिरी पंडितांशी विशेष चर्चा झाली’, असे मोदी यांनी नंतर टिष्ट्वटरद्वारे सांगितले. तत्पूर्वी, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी भारत सरकारने देशाच्या प्रगतीसाठी आणि प्रत्येक भारतीय सक्षम होण्यासाठी उचललेल्या पावलांना आपला नि:संदिग्ध पाठिंबा काश्मिरी पंडितांनी व्यक्त केला, असे टिष्ट्वटरवर म्हटले. शिष्टमंडळाने आमचा सात लाख संख्येतील समाज मोदी यांच्या सरकारचा ऋणी आहे, असे सांगून मोदी यांचे आभार मानले.गुड टाइमअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ह्युस्टनला ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमासाठी जाताना टष्ट्वीट केले. ‘ह्युस्टनमध्ये माझ्या मित्राबरोबर (नरेंद्र मोदी यांच्यासमवेत) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात आहे. टेक्सासमध्ये हा एक चांगला दिवस असेल’, असे टष्ट्वीटमध्ये म्हटले.ट्रम्प यांच्या या टष्ट्वीटला उत्तर देताना मोदी यांनीही टष्ट्वीट केले. ‘खरोखरच हा चांगला दिवस असेल. तुमच्या भेटीची वाट पाहत आहे’.महापौरांनी केले स्वागतह्युस्टनचे महापौर सिल्व्हेस्टर टर्नर यांनी कार्यक्रमात सर्वांचे स्वागत केले. अमेरिका हा भारताचा मित्र आहे, याचा अभिमान आहे, असे ते म्हणाले. यावेळी अनेक राज्यांचे प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते. आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ट्रम्प भारतात येणार असल्याची माहितीही यावेळी सूत्रांनी दिली.

टॅग्स :Howdy Modiहाऊडी मोदीNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प