शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सुनीताचे अंतराळातील वेतन, ओव्हरटाइम अन् भत्ते किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 10:08 IST

२८७ दिवसांपासून अडकलेले सुनीता आणि बुच यांना नेमके वेतन किती आणि त्यांच्या या ‘ओव्हरटाइम’साठी त्यांना किती अधिकचा भत्ता दिला जातो, याची चर्चा आता रंगली आहे.

वॉशिंग्टन : फक्त आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर गेलेले मूळ भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांना तांत्रिक अडचणींमुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) अडकून पडावे लागले. नऊ महिन्यांहून अधिक काळापासून ते आयएसएसवर अडकले आहेत. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी स्पेसएक्सच्या ‘ड्रॅगन’ या अंतराळ यानाने आयएसएसवर पाऊल ठेवले आहे. परवा, दि. १९ मार्च रोजी हे दोघे पृथ्वीवर परत येतील, असे सांगण्यात येत आहे.

२८७ दिवसांपासून अडकलेले सुनीता आणि बुच यांना नेमके वेतन किती आणि त्यांच्या या ‘ओव्हरटाइम’साठी त्यांना किती अधिकचा भत्ता दिला जातो, याची चर्चा आता रंगली आहे.

अंतराळवीरांना नेमका किती मिळतो दैनिक भत्ता? नासाच्या माजी अंतराळवीर कॅडी कोलमन यांच्यानुसार, अंतराळवीरांना  ‘ओव्हरटाइम’ मिळत नाही. फेडरल कर्मचारी असल्यामुळे ते अंतराळात जितका वेळ राहतात तो वेळ पृथ्वीवरील वेळेसारखाच सामान्य कामाच्या तासांचा काळ समजला जातो. अंतराळातील खाण्यापिण्याची व्यवस्था आणि खर्च नासामार्फत केला जातो. अंतराळातील वास्तव्यादरम्यान त्यांना अवघा ३४७ रुपये प्रतिदिन दैनिक भत्ता मिळतो. 

२०१०-११ मध्ये कोलमन या १५९ दिवसांच्या मिशनवर अंतराळ स्थानकावर होत्या. यादरम्यान त्यांना एकूण ६३६ डॉलर (५५ हजार रुपये) दैनिक भत्ता प्राप्त झाला.हा हिशेब लावला तर सुनीता आणि बुच यांना २८७ दिवसांसाठी १,१४८ डॉलर (एक लाख रुपये) ‘ओव्हरटाइम’ मिळू शकतो. 

दोन्ही अंतराळवीरांना इतके मिळेल एकूण वेतन... दोन्ही अंतराळवीरांना जीएस १५ पे ग्रेड लागू आहे. फेडरल कर्मचाऱ्यांचा हा सर्वांत वरिष्ठ पे ग्रेड आहे. या पे ग्रेड अंतर्गत त्यांना वार्षिक १ लाख २५ हजार १३३ ते १ लाख ६२ हजार ६७२ डॉलर (सुमारे १.०८ कोटी ते १.४१ कोटी रुपये) वेतन मिळते. आता २८७ दिवसांसाठी त्यांना सुमारे ८१ लाख ते १.०५ कोटी रुपये संभाव्य वेतन मिळू शकते.

टॅग्स :Americaअमेरिका