शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

टुरिस्ट व्हिसा असल्यास अमेरिकेत किती दिवस मुक्काम करता येतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 14:53 IST

अमेरिकेत प्रवेश करताना तुम्ही किती मुक्काम करू शकता, त्याची माहिती दिली जाते.

प्रश्न- मला उन्हाळ्यात अमेरिकेत असलेल्या माझ्या मुलाच्या भेटीसाठी जायचंय. माझा मुलगा एच१बी व्हिसावर मिशिगनमध्ये काम करतो. मी भारतीय नागरिक असून मला नुकताच अमेरिकेचा टुरिस्ट व्हिसा मिळालाय. त्याची वैधता १० वर्षे आहे. मला किती काळ अमेरिकेत राहता येऊ शकेल?उत्तर: अमेरिकेच्या टुरिस्ट व्हिसाची मुदत आणि तुम्ही एकावेळी अमेरिकेत करत असलेल्या मुक्कामाचा कालावधी यात फरक आहे.दुतावास किंवा वकिलातीनं दिलेला व्हिसा तुम्हाला अमेरिकेत प्रवेश करताना (विमानतळ, बंदर, जमिनीवरील सीमा) कामी येतो. या ठिकाणी सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण (सीबीपी) अधिकारी तुम्हाला अमेरिकेत प्रवेश द्यायचा की नाही, याबद्दल अंतिम निर्णय घेतात. तुम्ही अमेरिकेत किती काळ राहू शकता, याचा निर्णयदेखील तेच घेतात. त्यानंतर तुमच्या पासपोर्टवर निळ्या रंगाचा शिक्का मारला जातो. तुम्ही अमेरिकेत किती दिवस राहू शकता, याची तारीखदेखील त्यावर असते.ही तारीख तुमच्या टुरिस्ट व्हिसावर देण्यात आलेल्या तारखेपेक्षा वेगळी असू शकते. ती तारीख तुमच्या व्हिसाची वैधता संपल्यानंतरचीही असू शकते. व्हिसाची वैधता संपायच्या दिवशीही तुम्ही अमेरिकेत प्रवेश करू शकता. अमेरिकेत प्रवेश करताना सीबीपी अधिकाऱ्यानं निळ्या शिक्क्यासोबत नमूद केलेल्या तारखेपर्यंत तुम्ही वास्तव्य करू शकता. अमेरिकेच्या टुरिस्ट व्हिसाच्या मदतीनं तुम्ही कायम वास्तव्य करू शकत नाही आणि नोकरीदेखील मागू शकत नाही.सीबीपी अधिकाऱ्यानं दिलेल्या तारखेनंतरही तुम्ही अमेरिकेत राहिल्यास तुमचा व्हिसा रद्द केला जाऊ शकतो. अमेरिका सोडण्यासाठी देण्यात आलेली तारीख निघून गेल्यावरही बरेच दिवस तुम्ही मुक्काम केल्यास भविष्यातील व्हिसासाठी तुम्ही अवैध ठरू शकता. वैद्यकीय किंवा इतर महत्त्वाच्या कारणांमुळे तुम्हाला जास्त दिवस राहावं लागणार असल्यास युनायटेड स्टेट्स सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसकडून (यूएससीआयएस) परवानगी घेण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. तुम्हाला अमेरिकेतल्या मुक्कामाचा कालावधी वाढवून हवा असल्यास आय-५३९ अर्ज करा किंवा नॉनइमिग्रंट स्टेटसची मुदत बदलण्यासाठी/वाढवण्यासाठी अर्ज करा. अमेरिकेतील तुमचा वैध मुक्काम संपण्याच्या ४५ दिवस आधी तुम्हाला हा अर्ज करावा लागतो. 

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा