शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अमेरिकेच्या दूतावासाकडे व्हिसासाठी अर्ज करताना ऍप्लिकेशन फॉर्म कसा अपडेट करावा?

By कुणाल गवाणकर | Updated: November 7, 2020 10:00 IST

अमेरिकेत प्रवास करण्याचा हेतू लक्षात घेऊन तुम्ही कोणत्या व्हिसासाठी अर्ज करायचा हे निश्चित करा.

प्रश्न: मी मुंबईतल्या अमेरिकेच्या दूतावासाकडे व्हिसासाठी अर्ज करतोय. मी माझा ऍप्लिकेशन फॉर्म (डीएस-१६० किंवा डीएस-२६०) कसा अपडेट करावा?उत्तर: व्हिसासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांनी नॉनइमिग्रंट व्हिसासाठी डीएस-१६० आणि इमिग्रंट व्हिसासाठी डीएस-२६० अर्ज भरणं गरजेचं आहे. अमेरिकेत प्रवास करण्याचा हेतू लक्षात घेऊन तुम्ही कोणत्या व्हिसासाठी अर्ज करायचा हे निश्चित करा. त्यानंतर http://ceac.state.gov/ceac वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरता येईल.प्रत्येक अर्जासोबत एक अल्फा-न्युमरिक बारकोड तयार होतो. अर्ज जमा केल्यानंतर त्यातील बायोग्राफिकल माहिती बदलता येत नाही. त्यामुळे अर्ज जमा करण्याआधी त्यातील माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या. अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला एखादी चूक लक्षात आल्यास तुम्ही नवा ऑनलाईन अर्ज भरू शकता. त्यानंतर पुन्हा नवा बारकोड नंबर तयार होईल. बऱ्याचशा प्रकरणांमध्ये तुम्हाला व्हिसा शुल्क पुन्हा भरावं लागत नाही. याशिवाय तुम्ही आधी घेतलेल्या अपॉईंटमेंटची तारीखदेखील कायम ठेवू शकता. दूतावासात येताना सर्वात अपडेटेड कन्मफर्मेशन पेज आणि तुमच्या अपॉईंटमेंटचा बारकोड घेऊन घ्या.डीएस-१६० आणि डीएस-२६० अर्ज पूर्ण आणि अचूक भरलेला हवा. अर्धवट अर्ज भरला असल्यास तुम्ही चुकीची माहिती देत असल्याचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. त्यामुळे अमेरिकन व्हिसासाठी तुम्ही कायमचे अपात्र ठरू शकता. डीएस-१६० किंवा डीएस-२६० अर्ज ऑनलाईन जमा करण्याआधी त्यात पूर्ण आणि अचूक माहिती भरल्याची खात्री करून घ्या. बायोमेट्रिक्स आणि मुलाखतीच्या अपॉईंटमेंटवेळी डीएस-१६० किंवा डीएस-२६० अर्जाचं अपडेटेड कन्फर्मेशन पेज आणण्यास विसरू नका. 

टॅग्स :USअमेरिकाVisaव्हिसाAmericaअमेरिका