शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अमेरिकेच्या जाळ्यात कसा अडकला ड्रॅगन...? ट्रम्प यांनी चीनवर लादला 125 टक्के टॅरिफ, भारतासह 75 देशांना दिला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 09:44 IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर चीनविरुद्ध १२५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे...

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्द चांगलेच पेटले आहे. यापूर्वी अमेरिकेने चीनवर १०४ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती. यानंतर चीननेही आक्रमक भूमिका घेत अमेरिकेवर प्रत्त्युत्तरात ८४ टक्के टॅरिफ लादले. खरे तर, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे जाळे फेकले आहे, ज्यात चीन अडकताना दिसत आहे. आता अमेरिकेने चीनच्या प्रत्येक वस्तूवर 125 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. तर इतर 75 देशांवर लादण्यात आलेले टॅरिफ पुढील 90 दिवसांसाठी रोखण्यात आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर चीनविरुद्ध १२५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफ धोरणानुसार, जर एखाद्या देशाने अमेरिकन वस्तूंवर टॅरिफ लादला, तर अमेरिकाही त्याच प्रमाणात टॅरिफ लादेल. मात्र, आता याचा सर्वाधिक फटका चीनला बसत आहे.

आता अमेरिकेला लुटण्याची वेळ संपली : ट्रम्प -चीनवर अमेरिकन बाजारपेठेचे शोषण केल्याचा आरोप करत ट्रम्प म्हणाले, "आता अमेरिकेची लूट करण्याचा काळ संपला, हे चीनला समजावण्याची वेळ आली आहे." ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी ७५ देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लादले होते. मात्र, आता त्यांनी याला ९० दिवसांची स्थगिती दिली आहे. कारण या देशांनी कोणतीही स्वरुपाचे प्रत्युत्तरात्मक पाऊल उचलले नाही आणि टॅरिफच्या मुद्यावर अमेरिकेशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. महत्वाचे म्हणजे, भारतासह जगातील ५० देशांनी टॅरिफसंदर्भात चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही अमेरिकेने म्हटले होते. 

अमेरिका-चीन व्यापार युद्ध -ट्रम्प यांच्या धोरणावरून स्पष्ट होते की, अमेरिकेचा मुख्य विरोधक चीन आहे. एकीकडे चीन स्वतःला जागतिक नेता म्हणून सादर करत असतानाच, दुसरीकडे ट्रम्प त्याला एकाकी पाडण्याची खेळी खेळताना दिसत आहेत. अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर टॅरिफ लादल्याने चीनकडून स्वस्त वस्तूंचा पुरवठा थांबेल. चिनी वस्तू महाग होतील. याचा चीनच्या निर्यात अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल. 

टॅग्स :Trade Tariff Warटॅरिफ युद्धAmericaअमेरिकाchinaचीनXi Jinpingशी जिनपिंगDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प