शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

इस्रायलने कोरोनावर नियंत्रण कसे मिळवले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 05:23 IST

सर्जनशील मानवी प्रज्ञेतून होणाऱ्या नवनिर्मितीचा मूर्त आविष्कार म्हणजे विविध प्रकारचे तंत्रज्ञान.  उपलब्ध माहितीनुसार, पहिली लाट ओसरून जनजीवन पूर्वपदावर येण्याचा भास होतानाच दुसऱ्या लाटेच्या उसळीनंतर, इस्रायलमधे तब्बल ३० ठिकाणी विविध प्रयोग सुरू झाले.

गेल्या रविवारी इस्रायल नावाच्या छोट्याशा देशातून एक आशादायी बातमी जगासमोर आली. ही बातमी होती, कोरोनावरील नियंत्रणाची ! कोरोनापासून संपूर्ण मुक्तीच्या उंबरठ्यावर आज हा देश उभा  आहे. कोरोना विरोधातील लढ्यासाठी सरकारने निश्चित केलेली नियमावली, नागरिकांकडून नियमांचे काटेकोर पालन आणि तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करत उपचाराची गती वाढविणे या त्रिसूत्रीमुळे आज या देशाला कोरोना नियंत्रणाचा उंबरठा गाठणे शक्य झाले आहे. महाकाय देशांच्या तुलनेत इस्रायलचे भौगोलिक क्षेत्र  किरकोळ असले तरी, कोरोना महामारीवरील नियंत्रणासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्या देशातील सरकारने संशोधकांना आवाहन करुन अत्यंत प्रभावी मार्ग शोधला. 

सर्जनशील मानवी प्रज्ञेतून होणाऱ्या नवनिर्मितीचा मूर्त आविष्कार म्हणजे विविध प्रकारचे तंत्रज्ञान.  उपलब्ध माहितीनुसार, पहिली लाट ओसरून जनजीवन पूर्वपदावर येण्याचा भास होतानाच दुसऱ्या लाटेच्या उसळीनंतर, इस्रायलमधे तब्बल ३० ठिकाणी विविध प्रयोग सुरू झाले. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा  वापर करुन कोविड रुग्णांना मदत, जीवनदान देण्याचे प्रयोग करण्यात आले. पहिला प्रयोग होता कोविडच्या चाचणीचा निकाल कमीत कमी वेळात मिळावा, यासाठीचा!  २४ तासांवरून निकालाची वेळ अवघ्या ५० मिनिटांवर आणण्यात तेथील संशोधकांना यश आले. त्यामुळे रुग्णावर तातडीने उपचार  शक्य झाले. कोविड रुग्णांना ॲपच्या सहाय्याने निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. यामधे संगणकीकृत प्रोग्रामच्या माध्यमातून त्यांच्या शरीरात होणारे विविध बदल मिनिटागणिक नोंदवले जात होते.

गृह विलगीकरणात असलेल्या लोकांना आवश्यक ती औषधे व ऑक्सिजन किंवा तत्सम गरजेच्या साधनांचा पुरवठा होत होता. या साऱ्या गरजा आर्टिफिशियल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टिपून, त्या गरजेशी जोडलेल्या यंत्रणेला याची माहिती मिळाली की संबंधित रुग्णाला तातडीने मदत मिळत असे.  सह-आजार असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. त्यांच्या शरीरात कोरोनाचा विषाणू कोणत्या अवयवावर किती घात करत आहे, याचे सातत्यपूर्ण मॉनिटरिंग करण्यात येत होते. या बदलांच्या अनुषंगाने त्या रुग्णांवर औषधोपचार तर होत होतेच, पण या बदलांच्या नोंदी देखील काटेकोरपणे ठेवल्या जात होत्या.  या नोंदींमुळे विशिष्ट सह-आजारात तो विषाणू कोणत्या स्टेजला कसा प्रसार व घात करतो, याचे पॅटर्न डॉक्टरांच्या लक्षात आले आणि पुढील रुग्णांवर उपचार करताना त्याचा फायदा झाला. कोविड होऊन गेलेल्या नागरिकांना  प्लाझ्मा-दान करण्यासाठी आवाहन केले गेले. या मोहिमेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत, उपचार पद्धतीला हातभार लावला. 

छोट्या देशाची मोठी गोष्ट..या अदृष्य विषाणूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. मित्र,आप्तेष्टांचे प्राण जात आहेत. ठोस औषध आजही नाही. लसीकरणाच्या माध्यमातून रोग-प्रतिकारकशक्ती विकसित करणे हाच तूर्तास एक सर्वमान्य उपाय दिसत आहे. इस्रायल या देशाचे आकारमान लहान आणि लोकसंख्याही कमी. त्यामुळे भारतासारख्या महाकाय देशाशी तुलना करणेही अशक्यच आहे. पण नियोजन, इच्छाशक्ती, अंमलबजावणी, सरकारी सूचनांचे नागरिकांकडून गांभीर्यपूर्वक पालन याचीच फलश्रुती आज तेथील नागरिक अनुभवत आहेत. छोट्या देशाची ही मोठी गोष्ट म्हणूनच लक्षणीय आहे !छोट्या देशाची मोठी गोष्ट..या अदृष्य विषाणूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. मित्र,आप्तेष्टांचे प्राण जात आहेत. ठोस औषध आजही नाही. लसीकरणाच्या माध्यमातून रोग-प्रतिकारकशक्ती विकसित करणे हाच तूर्तास एक सर्वमान्य उपाय दिसत आहे. इस्रायल या देशाचे आकारमान लहान आणि लोकसंख्याही कमी. त्यामुळे भारतासारख्या महाकाय देशाशी तुलना करणेही अशक्यच आहे. पण नियोजन, इच्छाशक्ती, अंमलबजावणी, सरकारी सूचनांचे नागरिकांकडून गांभीर्यपूर्वक पालन याचीच फलश्रुती आज तेथील नागरिक अनुभवत आहेत. छोट्या देशाची ही मोठी गोष्ट म्हणूनच लक्षणीय आहे !

रुग्णांचा आकडा लोकसंख्येच्या १० टक्क्यांच्या वर गेल्यानंतर, एका कंपनीने लोकांच्या आवाजाचे नमुने आणि त्याद्वारे शरीरात होणाऱ्या बदलानुसार कोविड होण्याची शक्यता, असे सॉफ्टवेअर विकसित केले. याचाही वापर लोकांना पूर्वसूचना मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाला.  ज्यांचे औषधोपचारही संपुष्टात आले आहेत, अशा लोकांकडेही  सरकारने विशेष लक्ष ठेवले होते. त्यांच्या शरीरातील अवयवांवर कोरोनाने सोडलेल्या खुणा आणि त्यांचे पुढचे दिनमान, याच्याही नोंदी ठेवण्यात आल्या. शक्य तितकी सर्व माहिती संकलित करणे, त्याचे वर्गीकरण करून मग पृथःकरण करणे, यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्समार्फत उपचार पद्धतीत बदल करणे, या समीकरणावर प्रामुख्याने संशोधकांनी भर दिला. या आणि अशा तब्बल ३० तंत्राविष्काराच्या माध्यमातून इस्रायलने संसर्ग साखळी रोखण्याचा प्रयत्न केला. आजवर जगात झालेल्या अनेक महत्वाच्या संशोधनात इस्रायली संशोधकांनी मोलाची कामगिरी बजावलेली आहे.  प्रतिकूल परिस्थितीचा अनुशेष या देशाने विचक्षण संशोधनात्मक बुद्धिमत्तेने भरून काढल्याचे अनेक उदाहरणातून दिसते.उपचार पद्धतीत अत्याधुनिक, अमूलाग्र बदल करत लोकांना सुसज्ज उपचार देतानाच, दुसरीकडे कोरोनाची लसीकरण मोहीम देखील अत्यंत प्रभावीपणे राबवली गेली. गर्दी होणार नाही अशा पद्धतीने सूक्ष्म व्यवस्थापन करून लसीकरण करण्यात आले. आजच्या घडीला अर्ध्या देशाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सर्वात वेगवान लसीकरण करणारा इस्रायल हा जगातील पहिला देश ठरला आहे. -  कौस्तुभ कुर्लेकर

टॅग्स :Israelइस्रायलcorona virusकोरोना वायरस बातम्या