शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कसं झालं 'कोरोना'चं बारसं?; काय आहे त्याचा अर्थ?... जाणून घ्या Interesting माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 18:30 IST

Coronavirus गेल्या वर्षाच्या अखेरीस चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले; त्यानंतर जगभरात कोरोनाचं थैमान

मुंबई: कोरोनानं सध्या अनेकांना धडकी भरली आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनानं आतापर्यंत ४ हजारहून अधिकांचा जीव घेतलाय. तर कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. भारतात आतापर्यंत ८१ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातले १७ जण महाराष्ट्रातले आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं सरकारपासून सर्वसामन्यांपर्यंत सगळेच जण चिंतेत आहेत. गेल्या वर्षाच्या अखेरपर्यंत कोणालाही कोरोना शब्द फारसा कोणाला माहीत नव्हता. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर चीनमध्ये कोरोनाचे शेकडो रुग्ण झपाट्यानं सापडू लागले. याची सुरुवात वुहानपासून झाली. सध्याच्या घडीला पाच खंडांमधल्या शंभरहून अधिक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना नावाची एक प्रसिद्ध बिअर आहे. मात्र या कोरोनाचा सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूशी कोणताही संबंध नाही. कोरोनाचं नामकरण कसं झालं याची गोष्ट मोठी रंजक आहे. कोरोना शब्द लॅटिन भाषेतून आला आहे. त्याचा शब्दश: अर्थ मुकूट असा होता. क्नीन्सलँड सरकारच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, कोरोनाच्या विषाणूला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेनं पाहिल्यास त्याची रचना मुकूटासारखी दिसते. त्यामुळेच या विषाणूला कोरोना नाव देण्यात आलं. कोरोनामुळे जगात महारोगराईची स्थिती निर्माण झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. कोरोनाला जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड-१९ (COVID-19) असं नाव दिलं आहे. यातल्या CO चा अर्थ कोरोना, VI चा अर्थ व्हायरस आणि D चा अर्थ आजार असा होतो. तर १९ चा अर्थ २०१९ असा होतो. २०१९ मध्ये कोरोनाचा चीनमध्ये फैलाव झाला.  

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीन