पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर (PM Modi US Visit) आहेत. आज व्हाइट हाऊस येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाली. दरम्यान या दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे पत्रकारांशी संवाद साधला. यावळी, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत. ते एक महान नेते आहेत," अशा शब्दात ट्रम्प यांनी मोदींचे कौतुक केले. तसेच, भारत आणि अमेरिका नेहमीच मित्र बणून राहतील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान, भारत-चीनसोबतच्या पॉलिसीसंदर्भात विचारले असता, "आम्ही कुणालाही मात देऊ शकतो. मात्र, आम्ही कुणालाही मात देण्याचा विचार करत नही, असेही ट्रम्प यांनी संपष्ट केले.
यावेळी, आपण भारतासोबत कठोर होऊन चीनला कशी मात देणार? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता, ट्रम्प म्हणाले, "आम्ही कुणालाही मात देऊ शकतो. मात्र, आम्ही कुणालाही मात देण्याचा विचार तर नाही. आम्ही 4 वर्षे चांगले काम करत होतो. मात्र आम्हाला रोखले गेले आणि एक अत्यंत खराब प्रशासन आले. आता आम्ही पुन्हा चागले काम सुरू ठेऊ आम्ही मजबूत होऊ."आम्ही बऱ्याच गोष्टींवर चर्चा करणार आहोत - ट्रम्प पुढे म्हणाले, 'पंतप्रधान मोदी येथे असणे ही मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. ते माझे खूप जुने मित्र आहेत. आमचे खूप चांगले संबंध आहेत आणि आम्ही हे नाते ४ वर्षांच्या कालावधीत टिकवून ठेवले. आम्ही आता पुन्हा सुरुवात केली आहे. मला वाटते, आमच्याकडे बोलण्यासाठी अनेक मोठ्या गोष्टी आहेत. एक म्हणजे, ते आपले तेल आणि गॅस खरेदी करणार आहेत. आपल्याकडे जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक तेल आणि गॅस आहे. त्यांना याची आवश्यकता आहे आणि आपल्याकडे ते आहे. आम्ही व्यापारासंदर्भात चर्चा करणार आहोत.
पंतप्रधान मोदीही म्हणाले, 'एक और एक 11'...!" -"भारत आणि अमेरिकेच्या भागिदारीने मानवतेला मोठा लाभ होईल. ट्रम्प आम्हाला मेक अमेरिका ग्रेट अगेनची आठवण करून देतात. याच पद्धतीने 2047 पर्यंत भारताला एक विकसित देश बनवणे 1.4 अब्ज भारतीयांची आकांक्षा आणि संकल्प आहे. आपल्या भेटीचा अर्थ 'एक और एक 11' आहे. जो मानवतेसाठी एकत्रितपणे काम करेल," असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल दिल्या शुभेच्छा -यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील भव्य विजयाबद्दल स्वतःसह संपूर्ण देशाच्या वतीने शुभेच्छाही दिल्या. तसेच, आपल्याल येथे (व्हाइट हाऊस) पाहून अत्यंत आनंद होत आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.