शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील अमेरिकन नागरिक नोव्हेंबरमधील अध्यक्षीय निवडणुकीत कसं मतदान करू शकतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 17:06 IST

अध्यक्षीय निवडणुकीत मतदान करण्यासाठी भारतातल्या अमेरिकन नागरिकांना प्रक्रियेचं पालन करावं लागेल

प्रश्न- मी अमेरिकेचा नागरिक असून भारतात वास्तव्यास आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत मी कसं मतदान करू शकतो?उत्तर- सर्वप्रथम मतदानासाठी नोंदणी करा. तुमची राज्यातील नोंदणी सर्वप्रथम पडताळून पाहा. गैरहजर मतदारांनी वार्षिक नोंद करावी, असा काही राज्यांचा नियम आहे. त्यामुळे पुनर्नोंदणी आवश्यक असते. त्यासाठी FVAP.gov वर जा आणि तुम्ही ज्या राज्यात मतदानाचा हक्क बजावता, त्यावर जाऊन बॅलेट किंवा अन्य गोष्टींसाठी विनंती करा.यानंतर बॅलेटसाठी विनंती करा. बहुतांश राज्यं त्यांच्या निवडणूक संकेतस्थळावरून बॅलेटसाठी विनंती करण्याचा पर्याय उपलब्ध करून देतात. FVAP.gov च्या माध्यमातून तुम्हाला हा पर्याय सहज उपलब्ध होईल. तुम्ही फेडरल पोस्ट कार्ड ऍप्लिकेशन भरण्याचा पर्यायदेखील निवडू शकता. यामुळे तुम्ही फेडरल ऑफिसच्या सर्व निवडणुकांमध्ये मतदान करू शकता. यामध्ये वर्षभरात होणाऱ्या प्राथमिक आणि विशेष निवडणुकांचा समावेश असतो. स्वाक्षरी, दिनांक असलेले, व्यवस्थित भरलेले एफपीसीए अर्ज अमेरिकेच्या प्रत्येक राज्यातल्या सर्व स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्वीकारले जातात. इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमचं बॅलट उपलब्ध करून झाल्यावर त्याची निवड करा. तुमच्या राज्यानं अर्ज भरण्यासाठी दिलेल्या मुदतीचं पालन करा. तुम्हाला बॅलट मिळाल्यावर ते पूर्ण भरा. राज्य फेडरल ऑफिसच्या निवडणुकीच्या ४५ दिवस आधी मतदारांना बॅलट्स पाठवतात. त्यांना प्राथमिक निवडणुकीच्या ३० दिवस आधी ही बॅलट्स जमा करायची असतात. बहुतांश राज्य तुम्हाला बॅलेट मिळालं की नाही, याची ऑनलाईन खात्री करून घेतात.तुम्ही भरलेलं बॅलट परत पाठवा. काही राज्यं तुम्हाला भरलेले बॅलट इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परत करण्याची परवानगी देतात. तुमच्या राज्याला मतदानपत्र किंवा बॅलट कागदी स्वरुपात हवं असल्यास तुम्ही आंतरराष्ट्रीय मेल किंवा कुरियर सेवेचा आधार घेऊ शकता. तुम्ही पोस्टल पेड रिटर्न एन्वलपच्या माध्यमातून बॅलट पाठवू शकता. तुम्ही पाठवलेलं बॅलट अमेरिकेतल्या स्थानिक निवडणूक प्रशासनापर्यंत पोहोचेल याची काळजी घ्या. त्यासाठी बॅलट पेपर वेळेत पाठवा.निवडणुकीतील उमेदवार आणि विषय यांची माहिती मिळवण्यासाठी एफव्हीएपी लिंक पेज मदत करू शकतं. उमेदवारांची माहिती, त्यांना आधीच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाचा तपशील, विविध विषयांवरील त्यांची भूमिका ऑनलाईन उपलब्ध आहे. निवडणुकीच्या तारखा आणि डेडलाईन्स याबद्दलच्या माहितीसाठी एफव्हीएपीच्या व्होटिंग अलर्ट्सना सबस्क्राईब (vote@fvap.gov) करा. यासोबतच फेसबुक (@DODFVAP), ट्विटर (@FVAP) आणि इन्स्टाग्राम (@fvapgov) या माध्यमातून एफव्हीएपी अलर्ट देते.निवडणुकीतील मतदानाशी संबंधित तुमचे प्रश्न असल्यास अमेरिकेच्या मुंबईतील दूतावाताशी MumbaiACS@state.gov वर संपर्क साधा. 

टॅग्स :AmericaअमेरिकाElectionनिवडणूक