शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चालणार महाभियोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 07:55 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रक्रियेच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.

वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रक्रियेच्या प्रस्तावास प्रतिनिधी सभेत मंजुरी देण्यात आली आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये मतदान घेतलं असता 230 विरुद्ध 197 मतांनी हा प्रस्ताव पारीत करण्यात आला. प्रतिनिधी सभेत जास्त करून सदस्यांनी ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग कारवाई करण्याच्या बाजूनं मतदान केलं. तत्पूर्वी ट्रम्प यांनी प्रतिनिधी सभेतील स्पीकर नॅन्सी पेलोसी यांना एक पत्र लिहून महाभियोग प्रक्रिया थांबवण्याची विनंती केली होती. महाभियोग या कारवाईच्या माध्यमातून डेमोक्रेटचे सिनेटर शक्तीचा दुरुपयोग करत असून, हे असंवैधानिक असल्याचं ट्रम्प म्हणाले आहेत. अमेरिकेच्या इतिहासात असं जवळपास अनेक वर्षांनी होत आहे. डेमोक्रेट्स नेते नॅन्सी पेलोसी यांच्या मते, ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संविधानाचा घोर अपमान केला आहे. कोणीही कायद्याहून श्रेष्ठ नसल्याचंही नॅन्सी म्हणाल्या होत्या. ट्रम्प यांनी यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सैन्य कारवाईची धमकी दिली होती. तसेच त्यांनी दबाव टाकत माजी उपराष्ट्राध्यक्ष बाइडन आणि त्यांचा मुलगा हंटर याच्याविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना आदेश दिले होते. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.यूक्रेनचे राष्ट्राध्यक्षांशी राजकीय प्रतिस्पर्धासंदर्भात चर्चा केल्याचं ट्रम्प यांनी मान्य केलं असलं तरी असा कोणत्याही प्रकारचा मी दबाव टाकला नसल्याचा त्यांनी खुलासा केला आहे. खरं तर माजी उपराष्ट्राध्यक्ष बायडन 2020मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत ट्रम्प यांना टक्कर देऊ शकतात. 100 सदस्यांची संख्या असलेल्या सिनेटनं ट्रम्प यांच्या पक्षाचे 53 खासदार आहेत. त्यामुळे या प्रस्तावाला सिनेटची मंजुरी मिळाल्यास ट्रम्प यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. काय असते महाभियोग प्रक्रिया ?अमेरिकेच्या द्वि सदनीय विधिमंडळाला अमेरिकी काँग्रेस असं संबोधलं जातं. सिनेट (Senate) आणि प्रतिनिधी सभा  (House of Representatives) असे दोन सदन आहेत. अमेरिकेच्या संविधानानुसार, प्रतिनिधी सभेच्या बहुमतानंतर राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभिगोयाची प्रक्रिया सुरू केली जाते. राष्ट्राध्यक्षांव्यतिरिक्त असैन्य अधिकाऱ्याविरोधातही महाभियोग आणता येतो. देशद्रोह, लाच घेणे आणि मोठ्या गुन्हांचा आरोप असल्यावरच अशा प्रकारची कारवाई करण्यात येते. आता काय होणार ?आतापर्यंत अमेरिकेत कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला महाभियोगाच्या माध्यमातून हटवण्यात आलेलं नाही.  प्रतिनिधी सभा  (House of Representatives) महाभियोगाचा प्रस्ताव पारित होऊ शकतो. परंतु सिनेटमध्ये तो पारीत करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असतं. परंतु सिनेटमध्ये रिपब्लिकन खासदारांची संख्या जास्त आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प