शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांनी उडवले 'पत्रकाराचे शीर', व्हिडीओ केला प्रदर्शित

By admin | Updated: August 20, 2014 12:18 IST

अमेरिकेने इराकवर हवाई हल्ले करण्याच्या निर्णयाचा निषेधार्थ 'आयएसआयएस'च्या दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या पत्रकाराचे 'शीर' उडवले असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर रिलीज केला आहे.

ऑनलाइन लोकमत
बगदाद, दि. २० - -अमेरिकेने इराकवर हवाई हल्ले करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ 'आयएसआयएस'च्या दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या जेम्स फॉले या पत्रकाराचे 'शीर' उडवले असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे. तसेच व्हिडीओच्या शेवटी त्यांनी आणखी एका पत्रकाराला पकडल्याचे दाखवत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पुढील निर्णयावर त्याचे जीवन अवलंबून असेल अशी धमकीही दिली आहे. 
'अ मेसेज टू अमेरिका' या नावाने हा व्हिडीओ टाकण्यात आला आहे. 'आयएसआयएस'च्या ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले केले, त्यात अनेक मुसलमानांना जीव गमवावा लागला आहे. हे हल्ले असेच सुरू राहिले तर अमेरिकी नागरिकांना ठार करू, हे ओबामा यांनी लक्षात ठेवावे, अशी धमकीही या व्हिडीओत देण्यात आली आहे. त्यानंतर लगेच जेम्स याचे शीर उडवण्यात आले. 
जेम्स हे गेल्या पाच वर्षांपासून पश्चिम आशियातून रिपोर्टिग करत होते व दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात त्यांचे सीरियातून अपहरण करण्यात आले होते. 
हा व्हिडीओ प्रदर्शित झाल्यानंतर अमेरिकेतर्फे एक निवेदन जारी करण्यात आले आहे. 'जेम्स यांची हत्या करण्यात आल्याचा आयएसआयएसचा व्हिडीओ आम्ही पाहिला आहे. गुप्तचर यंत्रणा त्या व्हिडीओची सत्यता पडताळून पहात आहेत, असे त्यात म्हटले आहे.
इराकमधील दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी इराकवर हवाई हल्ला करण्याचा आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला आहे. त्या निषेधार्थचे दहशतवाद्यांनी हे कृत्य केले आहे.