शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बापरे ! चक्क किचनच्या सिंकमधून निघाला साप, त्यानंतर घडलं असं काही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 12:20 IST

जुवेनाइल ईस्टर्न बाऊन जातीचा विषारी साप होता. त्यानंतर सर्पमित्राच्या मदतीने हा साप घराबाहेर काढण्यात आला.

घरातील किचनच्या वॉश बेसिनमधून कॉक्रोच बाहेर येत असल्याचे बऱ्याच जणांनी पाहिलं असेल. पण किचनच्या सिंकमधून कधी चक्क साप बाहेर आलेला पाहिला आहे का?, विचार करूनही घाबरगुंडी उडाली ना. असेच काहीसे ऑस्ट्रेलियामध्ये घडले ज्याने सा-यांनाच चांगली धडकी भरवली. ऑस्ट्रेलियामधील क्विन्सलँडमध्ये राहणा-या मायकल हेलार्डबरोबर हा थरकाप उडवणारा प्रसंग घडला आहे. 

 

मायकल नेहमीप्रमाणे किचनच्या वॉश बेसिन सिंकमध्ये भांडी घासत होता.अचानक सिंकमध्ये लावलेल्या जाळीतून सापाचे तोंड दिसले. आतमध्ये काय आहे हे पाहण्यासाठी मायकलने जाळी थोडी सरकवली, बघतो तर काय तिथे चक्क जिवंत साप बसला होता. सापाला पाहून मायकेलची चांगलीच बोबडी वळाली होती. 

 

सापाला पाहताच त्याला काहीच सुचेना, हळूहळू साप सिंकच्या आतून बाहेर येत होता आणि त्याला काय करावे हे सुचेनासे झाले. मायकल आणि सापात अंतरही खूपच कमी होते. मायकलने परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला, जराही हालचाल न करता तो तसाच स्तब्ध उभा राहिला. सिंकच्या आत हात घालणार तेवढ्यात साप त्याच्या हाताजवळ आला. हा साधा साप नव्हता, तर जुवेनाइल ईस्टर्न बाऊन जातीचा विषारी साप होता. त्यानंतर सर्पमित्राच्या मदतीने हा साप घराबाहेर काढण्यात आला. 

 

मायकलने सांगितले की, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्कादायक प्रसंग होता. मी देवाचे आभार मानतो की मला काहीही झाले नाही. मायकलने हा प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला. या सापाचे फोटोदेखील शेअर केलेत. हे फोटो पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने तर म्हटले की, माझ्या किचन वॉश बेसिनमधून साधा किडादेखील येणार नाही, अशी व्यवस्था करेन. तर, एकीने लिहिले की, बाप रे हे सगळे वाचून मी तर आता भांडीच घासणार नसल्याचे म्हटले आहे. ईस्टर्न बाऊन साप हा जगातील दुसरा सर्वात विषारी साप मानला जातो. या लहान सापाचे विष अत्यंत विषारी असते. रेप्टाइल म्युझियम ऑस्ट्रेलियाच्या नुसार या सापाच्या दंशाने मृत्यू झालेल्यांची संख्याही अधिक  आहे.