शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘हाँगकाँग आमचा, आता तैवानची वेळ,’ चीनचे राष्ट्राध्यक्ष Xi Jinping यांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 13:15 IST

चीनची कम्युनिस्ट पार्टी (CPC) पुन्हा एकदा देशाची धुरा क्षी जिनपिंग यांच्याकडे सोपवणार आहे

चीनची कम्युनिस्ट पार्टी (CPC) पुन्हा एकदा देशाची धुरा क्षी जिनपिंग यांच्याकडे सोपवणार आहे. सीपीसीच्या 20 व्या अधिवेशनासाठी बीजिंगमध्ये पक्षाचे सदस्य एकत्र येत आहेत. 16 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबरपर्यंत ही बैठक चालणार आहे. यादरम्यान क्षी जिनपिंग यांनी पक्षाच्या सदस्यांना संबोधित केले. “चीनने मानवी इतिहासातील गरिबीविरुद्धची सर्वात मोठी आणि प्रदीर्घ लढाई लढली आहे. जगभरातील गरिबी कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत,” असे ते म्हणाले. यावेळी चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी तैवानचाही उल्लेख केला.

नव्या युगात पक्ष आणि देशाला पुढे नेण्यासाठी आम्ही ठोस रणनीती तयार केली आहे. आम्ही प्रबळ राजकीय इच्छाशक्तीने राजकीय सुधारणा मजबूत केल्या आहेत, ज्याचे परिणाम अनेक क्षेत्रांत दिसून येत असल्याचे जिनपिंग म्हणाले. क्षी जिनपिंग यांनी सुरुवातीच्या भाषणात कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीची प्रशंसा केली. "आमच्याकडे जगातील सर्वात मोठ्या शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा आहेत,” असे ते म्हणाले. याशिवाय जिनपिंग यांनी आपल्या कोविड धोरणाचा बचाव केला. "आम्ही लोकांच्या सुरक्षिततेचे आणि आरोग्याचे सर्वोच्च पातळीवर संरक्षण केले आहे. महासाथीच्या काळात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांचे जीवन,” असेही त्यांनी नमूद केले.हाँगकाँगवर आता आमचं नियंत्रण“चीनच्या सुरक्षेसाठी आपण हवामान, पर्वत आणि नद्या जतन करणे आवश्यक आहे. त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. चीनच्या सुरक्षेसाठी लष्कर अधिक मजबूत करण्यात आले आहे. PLA वर पक्षाचे नेतृत्व पूर्णपणे स्थापित करण्यासाठी, आम्ही मजबूत आणि मूलभूत बदल केले आहेत, ज्याचे चांगले परिणाम मिळाले आहेत. हाँगकाँगमध्ये पूर्वी अराजकता असायची, पण आता ते पूर्णपणे चीनच्या ताब्यात आहे,” असा दावाही जिनपिंग यांनी केला.

तैवानला सोबत घेणार“तैवानच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आणि त्यात अन्य देशांचा हस्तक्षेप नाकारण्यासाठी आम्ही कठोर पावले उचलली आहेत. आम्ही तैवान आमचा मानतो आणि तो आमच्यासोबत सामील करू. आंतरराष्ट्रीय न्याय व्यवस्था निर्माण करण्यासाठी मानव-केंद्रित सर्वांगीण विकासाला बळकटी देण्यात आली आहे,” असे जिनपिंग म्हणाले. “पक्षातील कुरबुरी दूर करण्यासाठी आम्ही काही लोकांवर कारवाई केली आहे. काही लोकांना वाचवण्यासाठी देशातील १४० कोटी जनतेवर अन्याय होऊ देऊ शकत नाही. पक्षांतर्गत, लोकांमध्ये आणि लष्करांत छुपे धोके असू शकतात, हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Xi Jinpingशी जिनपिंगchinaचीन