शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्री ‘आऊट’, माजी पंतप्रधान ‘इन’; ब्रिटनमध्ये सुनक यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 07:27 IST

ब्रेक्झिटनंतर कॅमेरून यांनी जून २०१६ मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सोमवारी मंत्रिमंडळात फेरबदल केले. भारतीय वंशाच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांना याचा फटका बसला. त्यांची हकालपट्टी करून माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांना परराष्ट्रमंत्रिपद देण्यात आले आहे. सुएला यांच्या जागी परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेव्हरली यांची नियुक्ती झाली आहे.

ब्रेक्झिटनंतर कॅमेरून यांनी जून २०१६ मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. ४३ वर्षीय ब्रेव्हरमन यांची जागा परराष्ट्रमंत्री जेम्स क्लेव्हरली यांनी घेतली असून, त्यामुळे ५७ वर्षीय कॅमेरून यांच्यासाठी परराष्ट्रमंत्रिपद रिकामे झाले. ब्रिटनच्या राजांकडून या नियुक्त्यांना परवानगी मिळाल्याचे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)

वादग्रस्त सुएला सुनक यांच्या परवानगीशिवाय महानगरीय पोलिसांवर टीका करणारा सुएला यांचा एक वादग्रस्त लेख वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यापासून त्यांचे मंत्रिपद जाण्याची अटकळ बांधली जात होती. ४३ वर्षीय मूळ गोव्याच्या असलेल्या सुएला यांनी अलीकडेच ‘द टाइम्स’मधील एका लेखात इस्रायल - गाझा संघर्षावरून निषेध करणाऱ्यांना हाताळताना महानगरीय पोलिसांवर भेदभाव केल्याचा आरोप केला होता. 

टॅग्स :Rishi Sunakऋषी सुनक