कॅलिफोर्नियातील हिंदू मंदिरात तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेत ट्रम्प सरकार सत्तेत आल्यानंतर अजूनही हिंदूंवर हल्ले सुरुच असल्याचे समोर आले आहेत. कॅलिफोर्नियातील चिनो हिल्स येथील बीएपीएस हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. ही घटना लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या तथाकथित 'खलिस्तानी जनमत'च्या काही दिवस आधी घडली.
अमेरिका पाकिस्तानला धोकादायक देश घोषित करणार; पाकिस्तानींना देशात बॅन करण्याची तयारी
मंदिरात तोडफोड झाली असून हिंदूंविरोधी घोषणा लिहिल्या आहेत. मंदिराच्या भिंतीवर 'हिंदूंनो परत जावा' असं लिहिले आहे. यामुळे आता स्थानिक हिंदूंमध्ये चिंतेची वातावरण पसरले आहे.
बीएपीएसनेही या घटनेचा विरोध केला आहे. त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरील घटनेचा संदर्भ देत, संघटनेने म्हटले आहे की ते "येथे कधीही द्वेष रुजू देणार नाही" आणि शांतता आणि करुणा राखण्यासाठी काम करत राहील.