शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू महिलेनं पाकिस्तानमध्ये घडवला इतिहास, पाकिस्तानच्या राजकारणात असे कधीच झाले नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 16:34 IST

मुस्लिमबहुल पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात थारमध्ये वास्तव्याला असणारी हिंदू-दलित महिला कृष्णा कुमारी कोलहीला लोकांनी सिनेटर म्हणून निवडून दिलं आहे. 

कराची- मुस्लिमबहुल पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात थारमध्ये वास्तव्याला असणारी हिंदू-दलित महिला कृष्णा कुमारी कोलहीला लोकांनी सिनेटर म्हणून निवडून दिलं आहे. बिलावल भुट्टो जरदारी यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टी(पीपीपी)कडून 39 वर्षांची कृष्णा कुमारी कोलही निवडून आली आहे.डॉनच्या वृत्तानुसार, कृष्णा सिंध प्रांतातल्या महिलांसाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघातून निवडून आली आहे. कृष्णानं निवडणुकीत तालिबानशी संबंधित असलेल्या एका मौलानाचा पराभव केला आहे. कृष्णाची सिनेटर म्हणून निवड झाल्यामुळे पाकिस्तानातल्या अल्पसंख्याकांचे अधिकार आणि महिलांसाठी ती एक मैलाचा दगड ठरणार आहे. कोलही सिंध प्रांतातील थारमधल्या सुदूर नगरपारकर जिल्ह्यातील रहिवासी आहे. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या कृष्णाचे वडील शेतकरी आहेत.1979मध्ये जन्मलेल्या कृष्णाचं 16व्या वर्षीच लग्न झालं. त्यावेळी कृष्णा 9व्या इयत्तेत शिकत होती. लग्नानंतरही कृष्णानं शिक्षण घेणं सुरूच ठेवलं. 2013साली कृष्णानं सिंध विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात मास्टर्सची पदवी संपादन केली. त्यानंतर कृष्णा स्वतःच्या भावाबरोबरच पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये कार्यकर्ती म्हणून सहभागी झाली. कोलहीनं अल्पसंख्याकांच्या अधिकारासाठी आवाज उठवला. कृष्णा स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवाराशी निगडित आहे. या निवडणुकीत माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन पार्टीनं 15 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच संसदेत ती सर्वात मोठी पार्टी म्हणून समोर आली आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तान