शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

बांगलादेशात हिंदू मंदिरांवर पुन्हा हल्ला; दिवाळी, काली पूजेपूर्वीच धार्मिक तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 23:25 IST

ढाका - बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले सुरूच आहेत. सोमवारी रात्री उशिरा नौगाव जिल्ह्यातील दोन गावांतील वेगवेगळ्या मंदिरांवर धर्मांध हल्लेखोरांनी ...

ढाका - बांगलादेशातहिंदू मंदिरांवर हल्ले सुरूच आहेत. सोमवारी रात्री उशिरा नौगाव जिल्ह्यातील दोन गावांतील वेगवेगळ्या मंदिरांवर धर्मांध हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी मंदिरात ठेवलेल्या देवतांच्या मूर्तींची मोडतोड केली. दिवाळी आणि काली पूजेपूर्वीच पुन्हा सुरू झालेल्या या हल्ल्यांमुळे बांगलादेशातील धार्मिक तणाव आणखी वाढला आहे. याआधी नवरात्रीच्या काळात बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये दुर्गा पेडॉल आणि मंदिरांवर हल्ले झाले होते.

प्रशासकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर -बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, हल्ल्याची माहिती मिळल्यानंतर, पोरशा उपजिल्ह्याचे अधिकारी मोहम्मद नजमुल हमीद रझा मंगळवारी घटनास्थळी पोहोचले. तसेच घटनेत सहभागी असलेल्यांचा शोध सुरू आल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. या परिसरात हिंदू मंदिरात घुसून देवतांच्या मूर्तींची तोडफोड केल्याची घटना यापूर्वी कधीही घडली नसल्याचा दावाही त्यांनी केला.

इस्कॉन मंदिरावरही झाला होता हल्ला -गेल्या 15 ऑक्टोबरला नोआखली भागात धर्मांधांनी इस्कॉन मंदिरातही तोडफोड केली होती. यादरम्यान हल्लेखोरांनी मंदिरात उपस्थित भाविकांनाही मारहाण केली होती. इस्कॉन मंदिराने ट्विट केले होते, की या हल्ल्यात अनेक भाविक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धर्मांधांच्या जमावाने मंदिर परिसरात जाळपोळही केली होती. 

दुर्गा पूजा मंडपांवरही हल्ले -बांगलादेशात नवरात्रीच्या काळात अनेक दुर्गा पूजा मंडपांवरही हल्ले झाले आणि तोडफोड करण्यात आली. कोमिला शहरातील नानुआर दिघी तलावाजवळील दुर्गा पूजा मंडपात कुराणाची कथित विटंबना झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरवली गेली. यानंतर धर्मांधांच्या जमावाने चंदपूरमधील हाजीगंज, चट्टोग्राममधील बांशखली आणि कॉक्स बाजारमधील पेकुआ येथे हिंदू मंदिरे आणि मंडपांवर हल्ले केले होते.

टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूMuslimमुस्लीमDiwaliदिवाळी 2021