शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

या मुस्लिमबहुल देशात हिजाब आणि बुरख्यावर बंदी; नियम मोडल्यास 60 हजार रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 21:14 IST

देशाच्या संसदेने हिजाब आणि बुरखा बंदीसाठी थेट कायदाच काढला आहे.

Ban on Hijab in Tajikistan : गेल्या काही काळापासून फक्त भारतातच नाही, तर जगभरातील अनेक देशांमध्ये हिजाब आणि बुरखा परिधान करण्यावरुन वाद सुरू आहे. अनेक देशांनी यावर बंदी घातली आहे, तर काही देश बंदीच्या विचारात आहेत. अशातच आता मध्य आशियातील मुस्लिम देश असलेल्या ताजिकिस्तानने मोठा निर्णय घेतला आहे. देशाच्या संसदेने हिजाब आणि बुरखा यांसारख्या इस्लामिक कपड्यांवर बंदी घालण्यासाठी थेट कायदाच काढला आहे. सध्या या कायद्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर ताजिकिस्तानच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक 19 जून रोजी मंजूर केले आहे. सभागृहाने कायदा मंजूर करताना या पोषाखाला "विदेशी" संबोधले. याशिवाय ताजिकिस्तानने 'ईदी'च्या सणादरम्यान लहान मुलांच्या पैसे मागण्याच्या प्रथेवरही बंदी घातली आहे. विशेष म्हणजे, सुमारे 1 कोटी लोकसंख्या असलेल्या ताजिकिस्तानमधील 96% पेक्षा जास्त लोक इस्लाम धर्माचे पालन करतात.

अध्यक्ष रुस्तम इमोमाली यांच्या नेतृत्वाखालील संसदेच्या 18 व्या अधिवेशनात कायद्यात बदल करण्यापूर्वी या विधेयकावर चर्चा करण्यात आली. यादरम्यान, ताजिकिस्तान संसदेने म्हटले की, महिलांनी चेहरा झाकणे अथवा हिजाब घालणे, हा ताजिक परंपरा आणि संस्कृतीचा भाग नाही. या कारणास्तव अशा विदेशी कपड्यांवर देशात बंदी घातली पाहिजे. हा कायदा नुकताच दोन्ही सभागृहांनी मंजूर केला आहे. आता हा कायदा लवकरच लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र, या विधेयकाबाबत देशाच्या विविध भागांतून अनेक आंदोलने होत आहेत.

नियमांचे पालन न केल्यास मोठा दंड नव्या कायद्यानुसार कायदा मोडणाऱ्यांना जबर दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नवीन विधेयकानुसार कायदा मोडल्यास एका व्यक्तीला 7,920 सोमोनी (सुमारे 61,623 भारतीय रुपये) पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो, तर कंपन्यांना 39,500 सोमोनीपर्यंत दंड होऊ शकतो. याशिवाय सरकारी अधिकारी आणि धार्मिक नेते दोषी आढळल्यास आणखी जास्त दंड भरावा लागू शकतो. अधिकाऱ्यांसाठी 54,000 सोमोनी आणि धार्मिक नेत्यांसाठी 57,600 सोमोनीपर्यंत दंड आकारला जाईल.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयMuslimमुस्लीमParliamentसंसद