शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 21:54 IST

Israel Hezbollah War : हिजबुल्ला या दहशतवादी समूहाशी वाढता तणाव पाहता राखीव सैनिकांना सक्रिय करत असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.

Israel Hezbollah War : बेरूत : इस्रायलकडून सतत होणाऱ्या हल्ल्यांना आता हिजबुल्लाहने प्रत्त्युतर देण्यास सुरुवात केली आहे. हिजबुल्लाहने इस्रायलच्या निवासी भागांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. हिजबुल्लाहने लेबनॉनमधून ४० रॉकेट इस्त्रायलच्या अप्पर गॅलीलीच्या निवासी भागात डागले. त्यापैकी काही इस्रायलच्या हवाई संरक्षणाद्वारे निकामी करण्यात आले. परंतु उर्वरित रॉकेट निवासी भागात पडले. 

या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त समोर आले नाही. दरम्यान, हिजबुल्ला या दहशतवादी समूहाशी वाढता तणाव पाहता राखीव सैनिकांना सक्रिय करत असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. हवाई हल्ल्यानंतर इस्त्रायली लष्कर आता लेबनॉनमध्ये जमिनीवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. आयडीएफने नॉर्दर्न कमांडच्या कमांडिंग ऑफिसरला आपल्या सैन्याला कारवाईसाठी पूर्णपणे तयार करण्यास सांगितले आहे.

नॉर्दर्न कमांडचे कमांडिंग ऑफिसर एमजी ओरी गॉर्डिन यांनी ७ व्या ब्रिगेडच्या सुरू असलेल्या सरावाची पाहणी केली. तसेच, यासंबधी तयारीचा आढावा घेतला. दरम्यान, इस्त्रायल लेबनॉनमधील हिजबुल्लाविरुद्ध आणखी कठोर कारवाईची योजना आखत आहे, असे बुधवारी केलेल्या घोषणेवरून दिसून येत आहे. हिजबुल्लाहने पहिल्यांदा तेल अवीवच्या दिशेने क्षेपणास्त्र डागल्यानंतर काही तासांनी ही घोषणा करण्यात आली. 

इस्त्रायली लष्कराने सांगितले की, ते उत्तरेकडील प्रदेशात सुरू असलेल्या मोहिमेसाठी दोन राखीव ब्रिगेडला पाचारण करत आहेत. यामुळे दहशतवादी संघटना हिजबुल्लाविरुद्धचा लढा सुरू ठेवण्यास मदत होईल, असे लष्कराने म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी इस्त्रायलने लेबनॉनमध्ये कार्यरत असलेल्या हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनेवर तांत्रिक युद्धाच्या माध्यमातून हल्ला केला होता. इस्रायलने हिजबुल्लाहच्या सैनिकांनी वापरलेले पेजर आणि वॉकी-टॉकी यांचा स्फोट केला होता.

टॅग्स :Israelइस्रायलInternationalआंतरराष्ट्रीयIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध