शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:04 IST

मुलाच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी डिंगने पत्नीला घटस्फोट दिला आणि मुलाला सोडून पळ काढला. त्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले.

चीनच्या हेबेई प्रांतातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ३१ वर्षीय ली शांग्झुआन या महिलेची तिच्या पतीनेच कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. हा विश्वासघाताचा हृदयद्रावक प्रकार समोर आल्यानंतर, ली आता न्यायासाठी संघर्ष करत आहे.

२०१३ मध्ये एका कार अपघातात लीला कंबरेखाली अर्धांगवायू झाला. उपचारादरम्यान तिची भेट डिंग नावाच्या व्यक्तीशी झाली. डिंगने स्वतःची ओळख एक सर्जन म्हणून करून दिली होती. दरम्यान, दोघांमध्ये जवळीक वाढू लागली. हळूहळू त्यांच्यात प्रेम फुलले आणि त्यांनी लग्न केले. मात्र, हा सुखी संसार फार काळ टिकला नाही.

पतीचे खोटे दावे आणि फसवणूकलग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांत डिंगला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने लीला व्यवसाय सुरू करण्याच्या नावाखाली ३० लाख युआन (सुमारे ३.५ कोटी रुपये) कर्ज घेण्यासाठी दबाव आणला. यासाठी त्याने लीला मारहाणही सुरू केली.

पीडित लीने सांगितले की, त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी डिंगने तिला घटस्फोट दिला आणि मुलाला सोडून पळ काढला. त्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले. डिंगचा सर्जन असल्याचा दावा खोटा होता. त्याला लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे हॉस्पिटलच्या इंटर्नशिपमधून काढून टाकण्यात आले होते आणि त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा परवाना नव्हता. त्याने ज्या व्यवसायाबद्दल सांगितले होते, तो देखील खोटा होता; लग्नाच्या वेळी तो आधीच कर्जात बुडालेला होता.

लीचा संघर्ष आणि न्यायासाठी लढाआज ली तिच्या मुलाला एकटीच वाढवत आहे, ज्याने कधीही त्याच्या वडिलांना पाहिले नाही. गेल्या महिन्यात लीने तिची हृदयद्रावक कहाणी सोशल मीडियावर शेअर केली. आयुष्याचा दीर्घकाळ व्हीलचेअरवर घालवलेली ली आता उभी राहू शकते. लाईव्ह स्ट्रीमिंग आणि ऑनलाइन वस्तू विकून ती तिच्या मुलाचा सांभाळ करत आहे. लीने डिंगविरुद्ध फसवणूक आणि घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला आहे, ज्याची सुनावणी जूनमध्ये होणार आहे.

टॅग्स :chinaचीनfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार