शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

युरोपीय देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 03:22 IST

सार्क, दक्षिण पूर्वेतील मित्र राष्ट्रांना मदतीचा हात

युरोपीय देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कहर सुरू झाला आहे. अशावेळी भारताकडून लस पुरवण्यासाठी पुढाकार घेतल्यास त्याचे दूरगामी परिणाम होतील, अशी पुस्तीही सूत्रांनी जोडली. मात्र, राजदूतांच्या पुणे भेटीवर बोलण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, आशिया खंडात चीनचा प्रभाव पाहता लस वितरणात भारताने स्वत:हून पुढाकार घेतल्याचेही ते म्हणाले.

नवी दिल्ली : ऑक्सफर्डच्या कोरोना लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात आलेले असताना जगातील विकसनशील देशांना स्वस्त लस देण्यासाठी भारताने प्रयत्न सुरू केले आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्स्फर्डमधील लसीची चाचणी सुरू असून, भारतीय संशोधकांनादेखील मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सुमारे शंभर देशांच्या राजदूतांशी परराष्ट्र मंत्रालयाने चर्चा सुरू केली आहे. तूर्त पाकिस्तान वगळता सार्क, काही युरोपीय देश व दक्षिण पूर्व आशियातील देशांशी परराष्ट्र विभागातील अधिकाऱ्यांनी संवाद सुरू केला आहे.

विविध देशांचे राजदूत पुण्यास भेट देतील या वृत्तावर मात्र बोलण्यास नकार देताना अधिकाऱ्यांनी लस पुरवण्यासाठी भारताकडून पुढाकार घेतला जात असल्याचे नमूद केले. दिल्लीत ५ नोव्हेंबरला परराष्ट्रमंत्री हर्षवर्धन शृंगला यांनीदेखील निवडक देशांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर विविध देशांमध्ये असलेल्या भारतीय राजदूतांशी चर्चा करून त्यांनी स्थानिक कंपन्यांना लस वितरणासाठी भारतात आणण्याची सूचना केली होती.भारताने आतापर्यंत मालदीव, बांगलादेश, चीन, नेपाळ, भूतानसह अमेरिकेसदेखील कोरोनाकाळात मदत पाठवली आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या कोरोनाने कोट्यवधी लोकांचा बळी घेतला. जगाचे अर्थकारण थांबले. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष लसीकडे लागले  आहे. 

अमेरिकेची लस महागडी असल्याने ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या (कोविशिल्ड) लसीला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. भारतात कोविशिल्डच्या निर्मितीत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटचे सहकार्य आहे. याच लसीकडून भारतालादेखील सर्वाधिक अपेक्षा आहेत. त्यामुळे इतर देशांनादेखील ही लस पुरवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून चाचपणी केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका