शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार कोटी अनुदान थांबवताच हार्वर्ड विद्यापीठाने थेट ट्रम्प प्रशासनाला खेचले कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 09:43 IST

गेल्या ११ एप्रिल रोजी ट्रम्प प्रशासनाने हार्वर्डला एक पत्र पाठवून विद्यापीठात सर्वंकष सुधारणा करण्याचे आदेश दिले होते.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाचा सुमारे २.२ अब्ज डॉलरचा (सुमारे १८ हजार कोटी रुपये) निधी रोखल्यावरून विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला दाखल केला आहे. हा निधी थांबवताना ज्या कारणांचा आधार दिला आहे ती कारणे विद्यापीठाच्या स्वायत्ततेसह घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. विद्यापीठात ज्यूंविरुद्ध (यहुदी) कारवायांमुळे व काही विद्यार्थी संघटनांना विशेष मान्यता दिल्यामुळे नाराज ट्रम्प प्रशासनाने या संस्थेवर निधी थांबवून कठोर कारवाई केली आहे.

सुधारणा करा :  प्रशासनाचे  आदेशगेल्या ११ एप्रिल रोजी ट्रम्प प्रशासनाने हार्वर्डला एक पत्र पाठवून विद्यापीठात सर्वंकष सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. शिवाय धोरणांत बदल करण्याची सूचनाही केली होती. मात्र, विद्यापीठाचे अध्यक्ष ॲलन गार्बर यांनी प्रशासनाच्या या मागण्यापुढे विद्यापीठ झुकणार नाही, असे बजावले होते. यानंतर तत्काळ विद्यापीठाचा २.२ अब्ज डॉलरचा निधी थांबवण्यात आला.

बोस्टन कोर्टात खटलाबोस्टन न्यायालयात दाखल या खटल्यात हार्वर्ड विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे की, ज्यूंविरोधी वातावरण आणि त्याचा वैद्यकीय, तंत्रज्ञान तसेच संशोधनविषयक बाबींशी काय तार्किक संबंध आहे हे सरकारने स्पष्ट केलेले नाही. यातून अमेरिकी जीवनशैली, देशाचे या क्षेत्रांतील यश किंवा सुरक्षेवर काय परिणाम होईल, हे पण सरकार मांडू शकलेले नाही. यातून तर नोकरशाहीच समृद्ध  यावर ‘व्हाइट हाउस’नेही प्रतिक्रिया देत करदात्यांच्या पैशावर या विद्यापीठात केवळ नोकरशाही समृद्ध होत असल्याचे म्हटले आहे. करदात्यांचा हा निधी म्हणजे विशेषाधिकार आहे. तो प्राप्त करण्यासाठी मूलभूत अटींची पूर्तता करण्यात हे विद्यापीठ अपयशी ठरले आहे.

निधी रोखल्याचा परिणाम होईल?ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाला दिला जाणारा हा प्रचंड निधी अडवल्यामुळे विद्यापीठातील संशोधन प्रकल्प, संशोधक तसेच नवोन्मेषावर गंभीर परिणाम होईल. यामुळे विद्यापीठाच्या विविध क्षेत्रातील प्रगतीला खीळ बसेल, असे सांगितले जाते.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प