शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

हॅपी बर्थडे ट्विटर... ट्विटरची आज दशकपूर्ती

By admin | Updated: March 21, 2016 14:33 IST

प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट्सपैकी एक असणा-या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या 'ट्विटर'ला आज १० वर्ष पूर्ण झाली आहेत.

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन,  दि. २१ - अवघ्या १४० कॅरॅक्टर्समध्ये युझर्सना आपल्या भावना पोहोचवायला लावणा-या, प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट्सपैकी एक असणा-या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या 'ट्विटर'ला आज १० वर्ष पूर्ण झाली आहेत. २१ मार्च २००६ साली ट्विटरचा सहसंस्थापक जॅक डॉर्सीने पहिले ट्विट केले होते. ' ट्विटर'च्या दशकपूर्तीनिमित्त आज सकाळापासून लाखो युझर्सनी शुभेच्छा दिल्या असून ट्विटरनेही एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांचे आभार मानले आहेत. ' #LoveTwitter' हा हॅशटॅगही आज ट्रेंडिगमध्य अव्वल स्थानावर आहे.
ट्विटरच्या वाढदिवसानिमित्त आज जाणून घेऊया ट्विटरबद्दल काही खास गोष्टी: 
 
इतिहास 
बिझ स्टोन, ईव्हान विलियम्स आणि जैक डॉर्सी या तिघांनी मिळून अमेरिकेच्या ऑस्टिन शहरात ही कंपनी सुरू केली. 'जस्ट सेंटिग अप माय ट्विटर' असे पहिले ट्विट जॅक डॉर्सीने २१ मार्च २००६ ला केले आणि ट्विटरचा उदय झाला. आजच्या घडीला ट्विटरवर दिवसभरात 50 कोटीहून अधिक ट्विट केले जातात तर वर्षभरात सुमारे २० अब्ज ट्विट्स केली जातात. 
 
युजर बेस 
ट्विटरचे यश मोजण्याचा मापदंड म्हणजे, त्यांचे मंथली अॅक्टिव्ह युझर्स. ट्विटरच्या माहितीनुसार, गेल्या ६ महिन्यात 30 कोटींहून अधिक अॅक्टिव्ह युझर्स असून अमेरिकेबाहेर ट्विटरचे 25 कोटी अॅक्टिव्ह यूजर्स आहेत.
 
कमाई
जाहिरातींच्या माध्यमातून ट्विटर चांगलीच कमाई करतं. २०१५ साली ट्विटरने २.२ अब्ज डॉलर्सची घसघशीत कमाई केली, २०१४ मध्ये हा आकडा १.४ डॉलर्स इतका होता. वॉल स्ट्रीट स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्विटरच्या एका शेअरची किंमत २६ डॉलर इतकी आहे.
 
ट्विटरवरील महत्वपूर्ण व्यक्ती
देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखापासून ते वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, पत्रकार यांच्यासह विख्यात सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण ट्विटरवर आहेतच. ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी व्यक्ती आहे गायिका केटी पेरी...  केटी पेरीचे तब्बल 8 कोटी 4 लाख फॉलोअर्स आहेत. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे गायक जस्टिन बीबर आहे, ज्याचे फॉलोअर्स आहे 7 कोटी. 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाही या यादीत असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांचे 7 कोटी 1 लाख फॉलोअर्स आहेत.
 
ट्विटरचे प्रतिस्पर्धी
गेल्या दशकभरापासून प्रसिद्ध असलेल्या ट्विटरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच असली तरी आजच्या स्पर्धेच्या युगात ट्विटरलाही प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावाच लागत आहे. ट्विटरप्रमाणेच आजच्या पिढीत लोकप्रिय असलेली आणखी एक सोशल नेटवर्किंग साईट म्हणजे फेसबूक आणि ट्विटरची प्रतिस्पर्धीही तेच आहे. प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट्सच्या यादीत फेसबूक १०० कोटींहून अधिक युझर्ससह अव्वल क्रमांकावर असून फेसबूकनेच विकत घेतलेले इन्स्टाग्राम 40 कोटी युझर्ससह दुस-या स्थानावर आहे. या यादीत ट्विटरचा तिसरा क्रमांक लागतो.