शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

ओलिसांना मुक्त करण्यास हमासचा अचानक नकार; इस्रायल भडकला, सैन्याला थेट आदेश दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 03:04 IST

...आता इस्रायलही संतापला असून, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी लष्कराला गाझामध्ये मोठी कारवाई करण्यास सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

इस्रायल आणि हमास यांच्यात दीड वर्षे युद्ध चालले. पॅलेस्टाइनमध्ये प्रचंड विध्वंस झाला. यानंतरच्या युद्धबंदीमुळे गाझावासीयांना काही प्रमाणात निश्चितच दिलासा मिळाला. मात्र, त्यांच्या अडचणी अद्यापही कमी होताना दिसत नाहीत. युद्धबंदीअंतर्गत कैदी आणि ओलीसांची अदलाबदली केली जात असतानाच, आता आपण इस्रायली ओलिसांना मुक्त करणार नाही, असे म्हणत हमासने सोमवारी अचानक पलटी मारली. यानंतर, आता इस्रायलही संतापला असून, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी लष्कराला गाझामध्ये मोठी कारवाई करण्यास सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

आपण पुढील आदेशापर्यंत इस्राइली ओलिसांना मुक्त करणार नाही, अशी घोषणा दहशतवादी संघटना हमासने केली आहे. इस्रायलने युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. यानंतर, इस्रायल भडकला असून, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्राइल काट्झ म्हणाले, हमासनेच युद्धविरामाचे उल्लंघन  केले. तसेच आपण गाझामध्ये इस्रायली समुदायाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सैन्याला तयारीत राहण्याचे आदेश दिले आहेत.

असे आहेत हमासचे आरोप -हमासचा सैन्य विंगचा प्रवक्ता अबू उबैदाने आरोप केला आहे की, 19 जानेवारीपासून युद्धविराम लागू असूनही इस्रायलने उत्तर गाझातील विस्थापितांच्या परतीच्या प्रवासात अडथळा आणला, गाझामध्ये हल्ले केले आणि मदत साहित्याचा पुरवठा थांबवला. खरे तर, गेल्या तीन आठवड्यांपासून युद्धबंदी बऱ्यापैकी कायम आहे. मात्र असे असले तरी, इस्रायली गोळीबारात पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या काही घटना ही घडल्या आहेत. 

अबू उबैदा पुढे म्हणाला, जोवर इस्रायल त्यांच्या जबाबदाऱ्यांचे पालन करत नाही आणि गेल्या आठवड्यांची भरपाई करत नाही, तोवर हमास आणखी कोणत्याही ओलिसाला सोडणार नाही. शनिवारी इस्रायली ओलीस आणि पॅलेस्टिनी कैद्यांची आणखी एक अदलाबदल नियोजित होती.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsraelइस्रायल