शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

डोनल्ड ट्रम्प यांनी उघडलं 'नरकाचं द्वार', हमासची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 13:18 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर जगभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. इस्रायली नेत्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले असले तरी पॅलेस्टाइनने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे

ठळक मुद्देजेरुसलेम ही पॅलेस्टाइनची राजधानी आहे आणि त्यासाठी लढणं आम्ही चालू ठेवू. या अनावश्यक निर्णयामुळे अमेरिकेने स्वतःची मध्यस्थाची भूमिका गमावली आहे. अशी प्रतिक्रिया पॅलेस्टाइनवादी नेत्यांनी दिली आहे.

जेरुसलेम- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर जगभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. इस्रायली नेत्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले असले तरी पॅलेस्टाइनने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तुर्कस्थानने इस्रायलशी सर्व संबंध तोडण्याची भाषा केली आहे तर हमास या दहशतवाद्यांची सघंटना या सर्वांपुढे एक पाऊल जात संभाव्य धोक्याची जाणीव करुन दिली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाने नरकाचे दार उघडले आहे अशी धोक्याची घंटा हमासने वाजवली आहे.

ट्रम्प यांनी घोषणा करण्यापुर्वी गाझामध्ये पॅलेस्टाइनच्या नागरिकांनी मोर्चे काढून अमेरिका आणि इस्रायलच्या निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या आणि त्या दोन्ही देशांचे झेंडे जाळले होते. तर इस्रायलचे राष्ट्रपती रियुविन रिवलिन यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. इस्रायलच्या स्वातंत्र्याला 70 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने यापेक्षा दुसरी कोणतीही चांगली भेट असू शकत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जेरुसलेला मान्यता मिळणं आणि सर्व दुतावास तेथे हलवणं ही घटना ज्यू लोकांचा या भूमीवर हक्क सिद्ध करण्याच्या आणि शांततेच्या मार्गातील मैलाचा दगड मानावा लागेल.यामुळे जेरुसलेमच्या आणि संपुर्ण प्रदेशाच्या (मध्य-पूर्व) शांतता प्रक्रियेला फायदा होईल असेही रिवलिन यांनी सांगितले. रिवलिन यांच्याबरोबर इस्रायलचे अनेक मंत्री व विविध पक्षाच्या नेत्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला असून अनेक वर्षांचे आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे मत व्यक्त केले आहे.तर पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी दूरचित्रवाणी वाहिनीवर दिलेल्या प्रतिक्रियेत अत्यंत नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांचा निर्णय म्हणजे अमेरिकेने शांतता प्रक्रियेतून अंग काढून घेतल्यासारखे आहे. इस्रायलच्या जमिन बळकावण्याची, वंशच्छेद करण्याच्या वृत्तीचा सन्मान केल्यासारखेच या या निर्णयामुळे होणार आहे. यापुढील धोरण आपण अरब देशांच्या नेत्यांना भेटून ठरवू असेही महमूद यांनी स्पष्ट केले आहे.

(अमेरिकेचा तेल अविवमधील दुतावास)

शांतता प्रक्रियेसाठी पॅलेस्टाइनतर्फे बोलणारे प्रमुख नेते सइब इरेकाट म्हणाले, "या निर्णयामुळे शांतता प्रक्रियेमध्ये अमेरिकेची भूमिक संपुष्टात आली आहे."इस्रायलच्या संसदेतील अरब खासदार हानिन झोआबी यांनीही अमेरिकेचा निषेध केला असून आपण पॅलेस्टाइनसाठी लढणे चालूच ठेवू असे स्पष्ट केले आहे. "जेरुसलेम ही पॅलेस्टाइनची राजधानी आहे आणि त्यासाठी लढणं आम्ही चालू ठेवू. या अनावश्यक निर्णयामुळे अमेरिकेने स्वतःची मध्यस्थाची भूमिका गमावली आहे."

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIsraelइस्रायलUSअमेरिका