शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

हमासने आणखी ३ इस्रायली ओलिसांना सोडले, त्याबदल्यात इस्रायलकडून १०० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 17:48 IST

हमास संघटनेने ओलिसांना सोडल्यानंतर, इस्रायलने १०० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांनाही सोडले आहे. 

गाझा: हमास संघटनेने आणखी तीन इस्रायली ओलिसांची सुटका केली. गाझा युद्धबंदी अंतर्गत शनिवारी हमास संघटनेने कडक सुरक्षेत इस्रायली ओलिसांना मुक्त केले. दरम्यान, हमास संघटनेने ओलिसांना सोडल्यानंतर, इस्रायलने १०० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांनाही सोडले आहे. 

सुरुवातीला हमास संघटना इस्रायली ओलिसांना सोडण्यास टाळाटाळ करत होती. मात्र, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कडक भूमिकेनंतर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कडक इशाऱ्यानंतर, हमास संघटनेने इस्रायली ओलिसांना सोडण्याचा निर्णय घेतला.

हमास संघटनेने तीन ओलिसांना सोडले असून त्यांना गाझा पट्टीतील रेड क्रॉसकडे सोपवले आहे, असे इस्रायलने म्हटले आहे. सुटका करण्यात आलेले तीन लोक आपल्यासोबत आहेत. त्यांना सर्वात आधी रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असे इस्रायलच्या सैन्याने एका निवेदनाद्वारे म्हटले आहे. 

दरम्यान, आयर हॉर्न (४६), सागुई डेकेल चेन (३६) आणि अलेक्झांडर (साशा) ट्रोफानोव्ह (२९) अशी हमासने सोडलेल्या इस्रायली ओलिसांची नावे आहेत. या तिघांचे  ७ ऑक्टोबर २०२३ रोजी अपहरण करण्यात आले होते. तसेच, आज सोडण्यात आलेले हे तिघेही थकलेले दिसून येत होते. मात्र, गेल्या शनिवारी सोडण्यात आलेल्या तिघांपेक्षा यांची प्रकृती चांगली असल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धInternationalआंतरराष्ट्रीय