शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

हमासने इस्रायलवर डागले 130 रॉकेट, भारतीय महिलेसह 28 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 10:40 IST

इस्रायलमध्ये राहणारी केरळची महिला फिलिस्तानी रॉकेट हल्ल्यात मृत्यूमुखी पडली आहे. अश्केलोन शहरातील 31 वर्षीय सौम्याच्या घरावर हमासने टाकलेले रॉकेट पडले

ठळक मुद्देइस्रायलमध्ये राहणारी केरळची महिला फिलिस्तानी रॉकेट हल्ल्यात मृत्यूमुखी पडली आहे. अश्केलोन शहरातील 31 वर्षीय सौम्याच्या घरावर हमासने टाकलेले रॉकेट पडले.

इस्रायल - इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरु झाले आहेत. हमासने इस्रायलच्या (Israel) दिशेने क्षेपणास्त्रे डागली होती. या हल्ल्याला इस्रायलकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. हमासने इस्रायलवर 130 रॉकेट डागली असून आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात एका भारतीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला मूळ केरळची असल्याची माहिती आहे. इस्रायलनेही हमासला चोख प्रत्युत्तर दिलंय.  

इस्रायलमध्ये राहणारी केरळची महिला फिलिस्तानी रॉकेट हल्ल्यात मृत्यूमुखी पडली आहे. अश्केलोन शहरातील 31 वर्षीय सौम्याच्या घरावर हमासने टाकलेले रॉकेट पडले. केरळमध्ये असलेल्या आपल्या पतीला व्हिडिओ कॉलद्वारे सौम्या बोलत असतानाच ही दुर्घटना घडल्याचे तिच्या दीराने पीटीआयशी बोलताना सांगितले. गेल्या 7 वर्षांपासून सौम्या या इस्रायलमध्ये घरेलू कामगार म्हणून काम करत होत्या. हमासने केलेल्या हल्ल्यात 10 लहान मुले आणि एक महिलेसह 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर 152 नागरिक जखमी झाले आहेत.  

दरम्यान, जेरूसलेमच्या अक्सा मशिदीबाहेर सोमवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यामध्ये शेकडो लोक जखमी झाले आहेत. त्यानंतर हमास संघटनेने इस्रायलला प्रत्युत्तर देण्याची भाषा सुरु केली. इस्रायलने जेरूसलेममध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांना घरे खाली करण्यास सांगितले आहे. जेणेकरून याठिकाणी यहुदी नागरिकांना राहता येईल. यावरुन पॅलेस्टिनी नागरिक इस्रायलमध्ये सातत्याने निदर्शने करत आहेत.

नेत्यानाहू म्हणाले

इस्रायल लष्कराने ट्विटमध्ये म्हटले आहे की, हवाई हल्ल्यात तीन हमास कार्यकर्त्यांना निशाना बनविण्यात आला आणि त्यांना ठार करण्यात आले. याचबरोबर 'देश मोठ्या सामर्थ्याने प्रत्युत्तर देईल', असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. तसेच, जेरुसलेमच्या दिवशी, गाझामधील दहशतवादी संघटनांनी लाल रेषा ओलांडून जेरुसलेमच्या हद्दीत क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे, असे बेंजामिन नेतान्याहू म्हणाले. 

टॅग्स :Israelइस्रायलDeathमृत्यूBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू