शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Languages : जगातील निम्म्या भाषा नष्ट होण्याचा गंभीर धोका, एका अभ्यासातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 06:50 IST

Languages : जगात अस्तित्वात असलेल्या हजारो भाषांपैकी निम्म्या भाषांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी एका अभ्यासातून काढला आहे.

कॅनबरा : जगात अस्तित्वात असलेल्या हजारो भाषांपैकी निम्म्या भाषांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी एका अभ्यासातून काढला आहे. प्रचलित असलेल्या अनेक भाषा लहान मुलांना शिकविल्या जात नसल्याने त्यांचे ज्ञान भावी पिढ्यांना होण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्या भाषा हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र हे संकट टाळण्यासाठी शास्त्रज्ञांनी ग्रामबँक ही डेटाबेस प्रणाली तयार केली आहे.

या अभ्यासात सहभागी झालेले ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीतील संशोधक हेडविग स्किरगार्ड, युनिव्हर्सिटी ऑफ ऑकलंडमधील प्रा. सायमन ग्रीनहिल यांनी सायन्स ॲडव्हान्स या नियतकालिकात एक लेख लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, जगात सात हजार भाषा अस्तित्वात असून त्यातील २४००हून अधिक  भाषांचा शास्त्रज्ञांनी अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. त्यांनी ग्रामबँक नावाने विविध भाषांच्या व्याकरणाचा एक व्यापक डेटाबेस तयार केला आहे. 

कोणत्याही भाषेत व्याकरणामुळे वाक्यांची व्यवस्थित रचना करता येते. त्यामुळे ग्रामबँक बनविताना व्याकरणाचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. हजारो भाषांची परस्परांशी तुलना करण्यासाठी शास्त्रज्ञांनी १९५ प्रश्न तयार केले व त्यांची उत्तरे शोधून ती ग्रामबँकेत समाविष्ट केली आहेत. (वृत्तसंस्था)

द. अमेरिका, ऑस्ट्रेलियातील स्थानिक भाषांवर संकट- शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, जगामध्ये इंग्रजीसह काही भाषेचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मात्र प्रत्येक देशातील काही भाषांच्या अस्तित्वाचा प्रश्न भावी काळात निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्वी ज्या भाषा नष्ट झाल्या, त्यात लिहिलेल्या गोष्टींचा अर्थ उकलणे खूप कठीण झाले आहे. - द. अमेरिका, ऑस्ट्रेलियातील स्थानिक लोकांच्या भाषांचा वापर कमी होत चालल्याने त्या लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. 

भाषा टिकविण्यास हवेत ठोस प्रयत्न- शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रांनी २०२२ ते २०३२ हे स्वदेशी भाषांचे दशक म्हणून जाहीर केले आहे. त्यानिमित्ताने जगात अस्तित्वात असलेल्या सात हजार भाषांपैकी प्रत्येक भाषा टिकून राहावी यासाठी ठोस प्रयत्न करणे आवश्यक आहे. - ही भाषा भावी पिढ्यांना अभ्यासक्रमात शिकविली जायला हवी, त्या भाषेत संभाषण, लेखन होणे आवश्यक आहे. त्या भाषेचे व्याकरण मुलांना नीट समजावून दिले पाहिजे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय