शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

हाफिज सईदचे २00 समर्थक पाकमध्ये निवडणूक लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 04:01 IST

पाकिस्तानात २५ जुलै रोजी होणाऱ्या संसदेच्या निवडणुकांत मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लश्कर-ए-तय्यबा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद हा अल्लाहू-अकबर तहरीक दुसºया संघटनेतर्फे २००हून अधिक उमेदवार उभे करणार आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानात २५ जुलै रोजी होणाऱ्या संसदेच्या निवडणुकांत मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लश्कर-ए-तय्यबा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद हा अल्लाहू-अकबर तहरीक दुसºया संघटनेतर्फे २००हून अधिक उमेदवार उभे करणार आहे. हाफिज सईद हा स्वत: निवडणूक लढणार नाही.निवडणुकांसाठी अलीकडेच हाफिज सईदने मिल्ली मुस्लीम लीग नावाचा पक्ष स्थापन केला. हा पक्ष म्हणजे जमात-उद-दावाचा भाग आहे. पण मिल्ली मुस्लीम लीग या पक्षाची पाकिस्तानातील निवडणूक आयोगाने अद्याप नोंद केलेली नाही. त्यामुळेच हाफिज सईदने या निवडणुका अल्लाहू-अकबर तहरीकतर्फे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा पक्ष नोंदणीकृत आहे.मात्र या पक्षातर्फे सईदच्या जमात-उद-दावाचेच समर्थक व नेतेच निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी मिल्ली व मुस्लीम लीगचे सैफुल्ला खलिद व एएटीचे अध्यक्ष अहमद बरी यांच्यात समझोता झाला आहे. त्यामुळे हाफिजचे हे सारे समर्थक एएटीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. हाफिजने मात्र स्वत: निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तो आपल्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहे. प्रचारास वेळ मिळावा, यासाठीच त्याने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, असे सांगण्यात येत आहे. आपले अधिकाधिक उमेदवारनिवडून आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे. (वृत्तसंस्था)दोन्ही संघटना दहशतवादीहाफिज सईदच्या लश्कर-ए-तय्यबा व जमात उद दावा या दोन्ही संघटनांना संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेने तर हाफिज सईदलाच आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले असून, त्याच्या अटकेसाठी १ कोटी डॉलरचे बक्षीसही लावले आहे. मध्यंतरी त्याला पाकिस्तानातच नजरकैदेत ठेवण्यात आले होते.मुशर्रफही उतरणार निवडणूक रिंगणातपेशावर हायकोर्टाने पाच वर्षांपूर्वी घातलेल्या आजन्म बंदीस सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने जनरल परवेज मुशर्रफ ही निवडणूक खैबर पुक्तुन्ख्वा प्रांताच्या चित्राल जिल्ह्यातून आणि कदाचित कराची शहरातून लढवतील, असे त्यांच्या आॅल पाकिस्तान मुस्लीम लीग पक्षाचे सरचिटणीस मोहम्मद आझम यांनी सांगितले.

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तान