शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर खोऱ्यातील हिंसा म्हणजे नव्या युगाची पहाट- हाफिज बरळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 17:58 IST

मरतानासुद्धा हे लोक पाकिस्तान आणि काश्मीर एक व्हावेत असी भाषा करत आहेत ही सगळी नव्या काश्मीरची नांदी आहे.

लाहोर- काश्मीर खोऱ्यातील हिंसा म्हणजे नव्या युगाची सुरुवात असल्याचे वक्तव्य कुख्यात दहशतवादी आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याने केले आहे. ''काश्मीर स्वतंत्र होणे ही देवाची इच्छा असून आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात फार रक्तपात झाला आहे. सर्वशक्तीमान असा देव हे सगळं पाहात आहे. तो लवकरच त्याचा निवाडा देईल, हे निवाडे स्वर्गातून येतात, वॉशिंग्टन वरुन नाही. त्या निवाड्यामुळेच काश्मीर स्वतंत्र होईल''. हाफिज सईदने हे गरळ लाहोरच्या गड्डाफी मैदानात भाषण करताना ओकले आहे.''भारतीय लष्कराने दगडफेक करणाऱ्या काश्मीरींना ठार मारले आहे, हे सगळे देव पाहात आहे. मरतानासुद्धा हे लोक पाकिस्तान आणि काश्मीर एक व्हावेत असी भाषा करत आहेत ही सगळी नव्या काश्मीरची नांदी आहे. आणि हा भारताचा पंतप्रधान (नरेंद्र मोदी) आम्हाला थांबवू शकत नाही. कारण ही सगळी देवाचीच इच्छा आहे. सगळे निर्णय व निवाडे देवाच्या इच्छेनेच होतात. ''अशा विखारी शब्दांमध्ये हाफिजने भाषण केले आहे.पाकिस्तानमध्ये सध्या निवडणुकांसाठी प्रचार सुरु आहे.हाफिज सईद आपल्या जमात उद दवाच्या लोकांना नॅशनल असेम्ब्लीमध्ये निवडून पाठविण्याची धडपड करत आहे. त्याचा मुलगा व जावईसुद्धा निवडणुकीत उतरले आहेत. तसेच त्याच्या पक्षाचे संसदेच्या व प्रांतीय सरकाराच्या निवडणुकासांठी 265 उमेदवार लढत आहेतय

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तान