शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

हाफीज सईद नजरकैदेतून सुटणार, न्यायालयाने दिले सुटकेचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 04:25 IST

लाहोर : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-ऊद-दावा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद याला नजरकैदेतून सोडण्याचे आदेश बुधवारी न्यायालयाने दिले.

लाहोर : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-ऊद-दावा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद याला नजरकैदेतून सोडण्याचे आदेश बुधवारी न्यायालयाने दिले. मुंबई हल्ल्यातील अपराध्यांना शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करीत असलेल्या भारताला यामुळे धक्का बसला आहे. या वर्षी जानेवारीपासून सईद अटकेत होता. सईद याच्यावर त्याने केलेल्या दहशतवादी कारवायांबद्दल अमेरिकेने १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीसही जाहीर केलेले आहे. हाफीज सईदची स्थानबद्धता आणखी तीन महिन्यांनी वाढवावी ही सरकारची मागणी पंजाब प्रांताच्या न्यायालयीन आढावा मंडळाने फेटाळली. या मंडळात लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा समावेश होता.सईदच्या ३० दिवसांच्या स्थानबद्धतेची मुदत येत्या दोन दिवसांत संपत असून, ती संपताच त्याला सोडण्याचे आदेश मंडळाने दिले. सईद जर आणखी कोणत्या खटल्यात हवा नसेल, तर त्याला सोडून देण्यात यावे, असे सरकारला सांगण्यात आले. मंडळाचे प्रमुख न्यायमूर्ती अब्दुल सामी खान होते. सरकारने जर त्याला इतर कुठल्याही खटल्यात ताब्यात घेतले नाही, तर दोन दिवसांत त्याची सुटका होईल. या निर्णयानंतर सईद म्हणाला की, मी काश्मीरच्या लढ्याला पाठिंबा देत असल्यामुळे भारत माझ्या मागे लागला आहे. भारताचे सगळे प्रयत्न फसले असून, माझी सुटका होणार आहे, असे सईद याने जमात ऊद दावाच्या टिष्ट्वटरवर टाकलेल्या छोट्याशा व्हिडीओमध्ये म्हटले. मुंबई हल्ल्याचा फेर तपास करावा व दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर सईद आणि लश्कर ए तय्यबाचा प्रमुख झकीऊर रहमानवर खटले भरावेत, अशी मागणी भारताने वारंवार केलेली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानhafiz saedहाफीज सईद