शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

हाफीज सईदचे हात रक्ताने माखलेले, सीआयएचे प्रतिपादन; पाकच्या राजकारणात दहशतवाद घुसविण्याचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:06 IST

मुंबई अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईद याचे हात रक्ताने माखलेले आहेत. त्याला पाकिस्तानच्या मुख्य राजकीय प्रवाहात दहशतवादाला स्थान द्यायचे आहे, असे प्रतिपादन अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचे माजी उपप्रमुख मायकेल मोरेल यांनी केले आहे.

वॉशिंग्टन : मुंबई अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईद याचे हात रक्ताने माखलेले आहेत.त्याला पाकिस्तानच्या मुख्य राजकीय प्रवाहात दहशतवादाला स्थान द्यायचे आहे, असे प्रतिपादन अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचे माजी उपप्रमुख मायकेल मोरेल यांनी केले आहे.जमात-उद-दावाचा प्रमुख आणि प्रतिबंधित लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक असलेल्या हाफीज सईद याला संयुक्त राष्टÑे व अमेरिकेने अतिरेकी घोषित केलेले आहे. अमेरिकेने त्याच्या शिरावर १0 दशलक्ष डॉलर बक्षीस ठेवले आहे. पाकिस्तान सरकारने काल त्याची नजरकैदेतून सुटका केली. सईद जानेवारीपासून २९७ दिवस नजरकैदेत होता.दोन वेळा सीआयएचे हंगामी प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारणाºया मायकेल मोरेल यांनी आपल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले की, सईद हा दहशतवादी आहे. अनेक हल्ल्यात त्याने लष्कर-ए-तोयबा आणि अल-कायदासोबत काम केलेले आहे. त्याचे हात रक्ताने माखलेले आहेत. आता त्याला पाकिस्तानी राजकारणात दहशतवादाला स्थान मिळवून द्यायचे आहे. (वृत्तसंस्था)लखीमपूर खेरी येथे आनंदोत्सव?उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमधील बेगम बाग कॉलनीत हाफीज सईदच्या सुटकेबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आल्याचे वृत्त आहे. काही लोकांनी आपल्या घरावर हिरवे झेंडे लावले, तसेच हाफीज सईद जिंदाबाद आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही माहिती कळताच जिल्हाधिकारी अक्षयदीप यांनी कॉलनीत पोलीस पथक तैनात केले.पाककडून समर्थनइस्लामाबाद : हाफीज सईदच्या सुटकेचे पाकिस्तान सरकारने जोरदार समर्थन केले आहे. त्याच्या सुटकेवर भारताने केलेल्या टीकेला उत्तर देताना पाकिस्तानी परराष्टÑ मंत्रालयाचे प्रवक्ते मोहंमद फैसल यांनी सांगितले की, संयुक्त राष्टÑ सुरक्षा परिषदच्या निर्बंध ठरावाच्या अंमलबजावणीस पाकिस्तान बांधील आहे. पाकिस्तानच्या सर्व नागरिकांसाठी कायदा समान आहे.येथे सर्व निर्णय कायद्यानुसार होतात, राजकीय आदेशाने नव्हे. पाकिस्तान सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेधच करतो.

टॅग्स :hafiz saedहाफीज सईद