शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

"बांगलादेशातील परिस्थिती जास्त चिंताजनक नाही"; सर्वपक्षीय बैठकीत सरकारने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 11:42 IST

बांगलादेशच्या संकटावर चर्चा करण्यासाठी भारत सरकारने सकाळी १० वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

All Party Meeting on Bangladesh Situation : शेख हसीना यांनी मंगळवारी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला. शेख हसीना यांनी लष्करी हेलिकॉप्टरमधून देश सोडून भारतात आश्रय घेतला. आरक्षणावरून दोन महिने सुरु असलेल्या गदारोळानंतर बांगलादेशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालीय. बांगलादेशच्या या संकटावर भारताचे बारीक लक्ष आहे. बांगलादेशातल्या परिस्थितीबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. यावेळी सरकारने बांगलादेशातील भारतीयांबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

बांगलादेशातील आरक्षणविरोधी हिंसक आंदोलनांदरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांनी अचानक राजीनामा देऊन देश सोडल्याने तेथे अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेशच्या संकटावर चर्चा करण्यासाठी भारत सरकारने सकाळी १० वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या बैठकीत सदस्यांना बांगलादेशातील परिस्थितीबाबत माहिती दिली. यानंतर सरकार संसदेत याविषयी महत्त्वाची देणार आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हिंसाचारग्रस्त देशातील १२,०००-१३,००० भारतीयांना बाहेर काढण्यासाठी बांगलादेशातील परिस्थिती इतकी चिंताजनक नव्हती असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी सांगितले . बांगलादेशातील सरकारविरोधी निदर्शने आणि ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यामुळे शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतर सरकार बांगलादेशातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असेही एस जयशंकर म्हणाले.

"सुमारे ८,००० भारतीय विद्यार्थी हे बांगलादेशातील हिंसाचारानंतर भारतात परतले आहेत. सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात पळून आलेल्या हसिना यांच्याशी सरकारने थोडक्यात चर्चा केली आहे. सरकारला हसीना यांला त्यांच्या भविष्यातील योजना ठरवण्यासाठी थोडा वेळ द्यायचा आहे,” असे जयशंकर यांनी सांगितले.

यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यासाठी एक दीर्घकालीन रणनीती असली पाहिजे, ज्यामध्ये बांगलादेशमध्ये निवडणुका होईपर्यंत अंतरिम सरकारचे शासन असेल, असे म्हटलं. यावर बोलताना एस जयशंकर म्हणाले की, "यासंदर्भात परिस्थिती विकसनशील आहे. जे सरकार येईल ते भारताशी योग्य व्यवहार करेल."

टॅग्स :BangladeshबांगलादेशS. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारत