शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

गुडन्यूज... 2022 पर्यंत कोरोना महामारी नष्ट होईल, WHO च्या शास्त्रज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 13:34 IST

कोरोनाचा नवीन ओमायक्रॉन हा व्हेरियंट वेगाने पसरत असताना, कोरोना महामारी 2022 पर्यंत संपुष्टात येईल, हे आश्चर्यकारक वाटते. मात्र, डब्लूएचओच्या 100 पेक्षा अधिक शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसच्या भविष्याबाबत एक महत्त्वाचं भाकित केलं आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा नवीन ओमायक्रॉन हा व्हेरियंट वेगाने पसरत असताना, कोरोना महामारी 2022 पर्यंत संपुष्टात येईल, हे आश्चर्यकारक वाटते.

नवी दिल्ली - कोरोना महामारीने जवळपास गेल्या 2 वर्षांपासून जगभरात थैमान घातलं आहे. पहिली लाट, दुसरी लाट आणि आता ओमायक्रॉनमुळे अनेक देशात कोरोनाची खबरदारी घेण्यात येत आहे. ओमायक्रॉनचे अनेक रुग्ण भारतात, महाराष्ट्रात आढळून आले आहेत. मात्र, हे रुग्ण कुठल्याही मोठ्या उपचाराशिवाय बरेही होत आहेत. कोरोनामुळे जगभरात आत्तापर्यंत 54 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पण, आता लवकरच जग कोरोनामुक्त होणार आहे. 2020 पर्यंत कोरोना महामारी संपुष्टात येईल, असे भाकितच WHO च्या वैज्ञानिकांनी केले आहे. 

कोरोनाचा नवीन ओमायक्रॉन हा व्हेरियंट वेगाने पसरत असताना, कोरोना महामारी 2022 पर्यंत संपुष्टात येईल, हे आश्चर्यकारक वाटते. मात्र, डब्लूएचओच्या 100 पेक्षा अधिक शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसच्या भविष्याबाबत एक महत्त्वाचं भाकित केलं आहे. या 100 वैज्ञानिकांनी एक अहवाल तयार केला आहे. कोरोना महामारी नष्ट होण्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. 2022 पर्यंत कोरोना मृत्युमुखी पडलेल्या संख्या शुन्य होईल. सन 2022 मध्ये कोरोना समूळ नष्ट होणार नाही, पण ही महामारी राहणार नाही. नवीन वर्षात कोरोनासारखी महामारी केवळ ताप-सर्दीच्या आजारासारखी असेल. 2022 मध्ये कोरोना रोगापासून बचाव करण्यासाठी अनेक औषधे तयार होतील. पुढील 3-4 महिन्यात शेकडो कोरोनावरील औषधे बाजारात येतील. सन 2022 च्या शेवटापर्यंत कोरोना त्या स्थितीत पोहोचले, जसा 2018 मध्ये स्पेनिश फ्लू आणि 2009 मध्ये स्वाईन फ्लू होता. कोरोनाचे 99 टक्के रुग्ण घरीच बरे होतील. जगा मास्क फ्री होईल, पण आजारी व्यक्तींना मास्क घालणे बंधनकारक असेल.

WHO चं महत्त्वाचं ट्विट

डब्लूएचओ संघटनेनं ट्विट करुन महत्वाची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये कोरोना महामारी संपुष्टात येण्याचं सांगण्यात आलंय. महामारी जरी नष्ट झाली, तरी सामाजिक आव्हानं कायम असणार आहेत. डब्लूएचओचे डायरेक्टर जनरल यांनी हे ट्विट केलं आहे. गरिबी, जलवायू परिवर्तन, नक्षलवाद, असमानता आणि इतर सामाजिक समस्यांना आपणास तोंड द्यावे लागले, असे या ट्विटमध्ये लिहिले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOmicron Variantओमायक्रॉन