शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

जाताजाता डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर डिजिटल स्ट्राईक

By जयदीप दाभोळकर | Updated: January 6, 2021 13:21 IST

सरकारचा हा कार्यकारी आदेश ४५ दिवसांच्या आत लागू होणार

ठळक मुद्देसरकारचा हा आदेश ४५ दिवसांच्या आत लागू होणारयापूर्वी अमेरिकेनंं टिकटॉकवर घातली होती बंदी

काही महिन्यांपूर्वी भारतानं सुरक्षेच्या कारणास्तव चीनच्या काही अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी चीनचे अली पे, व्ही-चॅट आणि काही अन्य अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या अ‍ॅप्सद्वारे चिनी सरकारला काही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवली जायची असा दावा ट्रम्प प्रशासनाकडून करण्यात आला आहे. सरकारचा हा कार्यकारी आदेश ४५ दिवसांच्या आत लागू होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे आपला पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या कार्यकाळामध्येच हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. या निर्णयाबाबत जो बायडेन यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नसल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपनी बाईट डान्सच्या मालकीच्या असलेल्या टिकटॉक या अ‍ॅपवर अमेरिकेनं बंदी घातली होती. अलीपे, व्ही चॅट पे यांच्यासह काही चिनी अ‍ॅप्स मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यात येत होते असं ट्रम्प प्रशासनानं सांगितलं. तसंच लाखो लोकांचा डेटा लीक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. याकडे पाहता अनेक अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनच्या डेटा चोरण्याच्या रणनितीवर वार करणं हा यामागील उद्देश असल्याचं ट्रम्प प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. या अ‍ॅप्सवर बंदीज्या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनानं घेतला आहे त्यामध्ये अलीपे (Alipay),  कॅमस्कॅनर (CamScanner), क्यू क्यू वॉलेट (QQ Wallet), शेअर इट (SHAREit), टेंन्सेंट क्यू क्यू (Tencent QQ), वी-मेट (VMate), वी चॅट पे (WeChat Pay) आणि डब्ल्यूपीएस ऑफिस (WPS Office) या अॅप्सचा समावेश आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाchinaचीनChinese Appsचिनी ऍप